मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन लॉलीपॉप

Photo of Chicken Lolipop by SUCHITA WADEKAR at BetterButter
692
3
0.0(0)
0

चिकन लॉलीपॉप

Oct-16-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन लॉलीपॉप कृती बद्दल

चिकन लॉलीपॉप सर्वानाच खूप आवडतात. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये गेलो की स्टार्टर म्हणून ही डिश घेतो त्यावेळी किमतीपेक्षा लॉलीपॉप कमीच येतात असे वाटते आणि पोट भरत नाही. लॉलीपॉप मनसोक्त खायचे असतील तर ते घरीच करणे जास्त चांगले. यापद्धतीने केलेले लॉलीपॉप अतिशय सुंदर, क्रिस्पी होतात आणि मनसोक्त खाता येतात. अजिनोमोटो अगदी चिमुटभरच वापरावा, ज्यांना नको असेल त्यांनी नाही वापरला तरी चालेल. अजिनोमोटो जास्त वापरल्यास शरीराला अपायकारक असतो म्हणून अगदी चिमूटभर म्हणजे तर्जनी आणि अंगठा यामध्ये बसेल एवढाच वापरावा. यामुळे लॉलीपॉप क्रिस्पी होतात. तेव्हा यापद्धतीने करून पहा आणि आवडले तर मला जरूर कळवा.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● अर्धा किलो चिकन लॉलीपॉप
  2. ● हिंग एक छोटा चमचा
  3. ● हळद एक छोटा चमचा
  4. ● लाल तिखट 3 छोटे चमचे
  5. ● मीठ आवश्यकतेनुसार
  6. ● अर्धे लिंबू रस
  7. ● आले 1 इंच
  8. ● लसूण 5-6 पाकळ्या
  9. ● कोथिंबीर
  10. ● कॉनफ्लॉवर 6 चमचे
  11. ● मैदा 2 चमचे
  12. ● चिमूटभर अजिनोमोटो
  13. ● टोमॅटो रेड खाण्याचा कलर छोटा पाव चमचा
  14. ● पाणी आवश्यकतेनुसार
  15. ● तळण्यासाठी तेल

सूचना

  1. 1. अर्धा किलो चिकन लॉलीपॉप स्वच्छ दूहुन घ्यावेत.
  2. 2. त्यामध्ये हिंग, हळद, मीठ, लालतिखट, लिंबूरस, आलं+लसूण+कोथिंबिरीचे वाटण घालावे.
  3. 3. सर्व चांगले मिक्स करून घ्यावे.
  4. 4. मैदा आणि कॉनफ्लॉवर यामध्ये पाणी घालून बॅटर करून घ्यावे.
  5. 5. हे बॅटर चिकन लॉलीपॉप मध्ये ओतावे आणि चिमूटभर (तर्जनी आणि अंगठा यामध्ये मावेल एवढाच वापरावा) अजिनोमोटो घालावा.
  6. 6. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे आणि तेल तापल्यावर मध्यम आचेवर लॉलीपॉप खरपूस तळून घ्यावेत.
  7. 7. आपले सर्वांच्या आवडीचे स्टार्टर तैय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर