मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी फ्राय

Photo of Fried Prawns by SUCHITA WADEKAR at BetterButter
3017
3
0.0(0)
0

कोळंबी फ्राय

Oct-16-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी फ्राय कृती बद्दल

हॉटेल मध्ये फिश खूप महाग असतात, सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडत नाही. परंतु हेच जर घरी बनवले तर मनसोक्त आनंद घेता येतो. आज अशीच मनसोक्त आनंद देणारी डिश घेऊन आलेय, जरूर try करा आणि आवडली का तेही जरूर कळवा.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● अर्धा किलो मोठी अथवा मध्यम आकाराची कोळंबी
  2. ● हिंग छोटा 1 चमचा
  3. ● हळद छोटा एक चमचा
  4. ● लालतिखट 3 चमचे
  5. ● मीठ आवश्यकतेनुसार
  6. ● अर्धे लिंबू रस
  7. ● तांदूळ पीठ एक वाटी
  8. ● बारीक रवा पाव वाटी
  9. ● तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन घ्यावी.
  2. त्यामध्ये हिंग, हळद, लालतिखट, मीठ, लिंबू रस घालून चांगले मिक्स करावे आणि दहा मिनिटे झाकण ठेवून (मॅरीनेट) द्यावे.
  3. एका प्लेट मध्ये तांदूळ पीठ आणि रवा एकत्र करून घ्यावा.
  4. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे.
  5. तेल तापले की मॅरीनेट केलेली एक एक कोळंबी घेऊन तांदळाच्या पिठात घोळवून कढईत सोडावी.
  6. आणि मंद आचेवर खरपूस तळून घ्यावी.
  7. कोळंबी फ्राय तैयार!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर