मुख्यपृष्ठ / पाककृती / खडा पाव भाजी

Photo of Khada Pav Bhaji by Manisha Lande at BetterButter
2661
2
0.0(0)
0

खडा पाव भाजी

Oct-17-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खडा पाव भाजी कृती बद्दल

खुपच टेस्टी व टेंमप्टिन्ग अशी डीश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. लादी पाव आवडीनुसार
  2. १ पॅकेट अमूल बटर
  3. २ वाटी मटार
  4. १ वाटी गाजराचे तुकडे
  5. १ वाटी फ्लॉवरचे तुकडे
  6. १ वाटी शिमला मिरचीचे तुकडे
  7. २ मध्यम आकाराचे बटाटे
  8. २ मोठे बारीक चिरलेले कांदे
  9. १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  10. १ मोठा चमचा टोमॅटो सॉस
  11. १/२ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  12. १/२ छोटं पॅकेट पाव भाजी मसाला
  13. १ छोटा चमचा लाल तिखट
  14. १/४ छोटा चमचा मिक्स मसाला
  15. २ ते ३ तमालपत्र
  16. १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  17. चवीनुसार मीठ
  18. तेल

सूचना

  1. प्रथम सर्व भाज्यांचे तुकडे मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या नंतर पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतल्या.
  2. प्रेशर कुकरच्या भांड्यात सर्व भाज्यांचे तुकडे, मटार, व बटाट्याचे तुकडे घालून त्या बुडतील इतके पाणी त्यात घातले.
  3. नंतर ते भांडे प्रेशर कुकरमध्ये ठेवुन गॅसवर ठेवून मोठया आचेवर २ शिट्ट्या देवुन शिजवून घेतलया.
  4. गॅसवर कढई ठेवून त्यात थोडं तेल, मस्का / बटर, व तमालपत्र घालून नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व आलं-लसुण पेस्ट घालून कांदे सोनेरी रंगावर भाजून घेतले.
  5. नंतर त्यात बारीक चिरलेलाटोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतला.
  6. नंतर त्यात शिजवलेल्या भाज्या मॅश ( भाज्या पुर्ण मॅश करायच्या नाहीत कारण खडा पावभाजी मध्ये भाज्या दिसायला हव्यात ) करुन घातल्या व कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात छान एकजीव करून घेतल्या.
  7. नंतर त्यात पावभाजी मसाला, लाल तिखट, टोमॅटो सॉस, मिक्स मसाला आणि थोडा भाज्या शिजवलेलं पाणी / स्टॉक, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, व वरून अजून थोडं बटर घालून मध्यम आचेवर १ ऊकळी येईपर्यंत शिजवून घेतली.
  8. लादी पावला थोडं बटर लावून गरम तव्यावर भाजून घेतले.
  9. खडा पावभाजीवर वरून थोडं बटर घालून भाजलेल्या लादीपाव बरोबर गरमागरम सर्व्ह केली.
  10. "खडा पावभाजी" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर