मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरी - पेरी चिकन

Photo of Peri Peri Chicken by Sanika SN at BetterButter
0
1
0(0)
0

पेरी - पेरी चिकन

Oct-25-2018
Sanika SN
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरी - पेरी चिकन कृती बद्दल

झणझणीत चिकन पाककृती

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • बेकिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. १ अख्खे छोटे चिकन (बेबी चिकन) साफ करून , धुवून घेतलेले)
 2. १ टीस्पून गार्लिक पावडर (ताजा कुटलेला लसूण ही चालेल) 
 3. १ टीस्पून धणेपूड
 4. १-१/४ टीस्पून लेमन सॉल्ट (साधे मीठ ही चालेल) 
 5. १/२ टीस्पून लाल मिरचीचे फ्लेक्स 
 6. १ टीस्पून पॅपरीका पावडर 
 7. १ टीस्पून सुकवलेली कोथींबीर ( ताजी बारीक चिरलेली कोथींबीर ही चालेल) 
 8. २ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
 9. १ टीस्पून लिंबाचा रस

सूचना

 1. साहित्य
 2. प्रथम चिकन सगळे मसाले, ऑलिव्ह ऑईल व लिंबाचा रस लावून ३०-४० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे.
 3. ओव्हन १८० डीग्रीवर प्री-हीट करावा.
 4. रोस्टींग ट्रेवर चिकन ठेवावे व २०-२५ मिनिटे बेक करावे. 
 5. जर का तुम्ही मोठे चिकन वापरत असाल तर ओव्हनच्या रोस्टींग टाईम मध्ये थोडा फरक पडू शकतो. 
 6. चिकनच्या मांडीच्या भागाला थोडे टोचून पहा, जर आतील रस बाहेर पडू लागला म्हणजे चिकन पूर्ण शिजलेले असेल. 
 7. १० मिनिटांनी ओव्हनमधून बाहेर काढा व उरलेला सगळा रस त्यावर ओता. 
 8. झणझणीत असे पेरी - पेरी चिकन सॅलॅडसोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर