मुख्यपृष्ठ / पाककृती / मठरी फ्लेवरड् तिखट पूरी

Photo of Mathari twist Tikhat Puri by Purva Sawant at BetterButter
640
3
0.0(0)
0

मठरी फ्लेवरड् तिखट पूरी

Oct-30-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मठरी फ्लेवरड् तिखट पूरी कृती बद्दल

महाराष्ट्रात तिखट पुरी दिवाळीसाठी बनवतात. यावेळी देेऊ या तिखट पूरीला पंजाबी ट्वीस्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. मैदा- २ कप
  2. वनस्पती तूप (डालडा)- १/२ कप
  3. जीरे, जाडसर कुटून-१/२ टीस्पून
  4. काळे मीरे, जाडसर कुटून-१ टीस्पून
  5. कलौन्जी (कांद्याचे बी)- १ टीस्पून 
  6. मीठ- चवीप्रमाणे
  7. तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मैदा चाळून घ्यावा.
  2. त्यात सर्व मसाले आणि मीठ घालावे.
  3. तूप कडकडीत तापऊन त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे.
  4. थोडस थंड झाल्यावर हाताने हळूहळू चोळून तूप मैद्यात सारखे मिसळून एकजीव करावे.
  5. मग लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून मैदा घट्ट भिजऊन घ्यावा.
  6. थोडा वेळ तसाच झाकून ठेवावा.
  7. नंतर पुन्हा चांगले मळून घेऊन त्याच्या छोट्या लाट्या कराव्यात.
  8. जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात व काट्याने त्यावर टोचे मारावेत. (नाहीतर पुरीसारख्या फुगतील आणि नंतर मऊ होतील.)
  9. तेल तापून घ्या. थोड्या थोड्या पुऱ्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा. तरच त्या खुसखुशीत होतील. 
  10. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर