Photo of Stuffed Balushahi by Aarti Nijapkar at BetterButter
1125
7
0.0(1)
0

Stuffed Balushahi

Nov-01-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा १ वाटी
  2. तूप १/२ वाटी
  3. बेकिंग पावडर १ लहान चमचा 
  4. बेकिंग सोडा  चिमूठभर
  5. मीठ किंचित
  6. तूप  तळण्यासाठी
  7. गार पाणी १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  8. पाक करण्यासाठी
  9. साखर २ वाटी
  10. पाणी १ वाटी
  11. सारणासाठी
  12. काजू १/३ वाटी 
  13. काजू १/३ वाटी 
  14. पिस्ता १/३ वाटी

सूचना

  1. मैदा एका भांड्यात चाळून घ्या मग त्यात मीठ ,बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून एकत्र करून घ्या
  2. मैद्यात तूप घालून मिश्रण एकत्र करून घ्या मग गार पाणी आवश्यकतेनुसार घालून पीठ मळून घ्या 
  3. पीठ जास्त मळू नये हाताच्या बोटांनी पीठ एकजीव करायचे आहे मग पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा
  4. पाक बनविण्याची कृती
  5. गॅसवर पॅन किंवा खोलगट भांड्यात साखर व पाणी घालून सतत ढवळत रहा साखर पूर्णपणे विरघळली की २ मिनिटे पाक शिजवून घ्या मग गॅस बंद करा (पाकात १ थेंब लिंबाचा रस घालावा )
  6. बालुशाही
  7. बालुशाही चे पीठ हाताच्या बोटानी तोडून पुन्हा एकजीव करून घ्यावे पिठाला मळू नये
  8. पिठाची लांब लळी बनवून त्याचे गोळे कापावे किंवा तोडावे एक गोळा घेऊन खोलगट करून त्यात सारण (ड्रायफ्रूईट्स भाजून त्याची जाडसर भरड) भरावे व गोळा व्यवस्तीत बंद करून घ्यावे जेणेकरून तळताना सारण बाहेर येणार नाही सर्व बाजुंनी बंद करून घ्या 
  9. मग मधोमध हाताच्या अंगठ्याने दाबा अशाप्रकारे सर्व  बालुशाही बनवून घ्या
  10. बालुशाही तळण्याची कृती
  11. गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून हलकं तापवून /गरम करून घ्या (जास्त कडकडीत तूप तापवू नये)
  12. तूप विरघळून तापले की नाही पाहायला पिठाचा लहान गोळा घालून पहावा , गोळा घातल्यावर तुपाला बुडबुडे आले आणि गोळा वर आला की समजा तूप गरम झाले आहे
  13. आता कढईत बालुशाही घाला व ते फुगून वर आले की एक बाजूने तळले की बालुशाही पलटून घ्या गॅस मोठा करा , मंद मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी बालुशाही तळून घ्या तळून झालेले बालुशाही चाळणीत काढावे म्हणजे जास्तीचं तूप निथळून जाईल
  14. आता तळलेले बालुशाही पाकात घाला व घोळवून घ्या
  15. गरमागरम बालुशाही खाण्यास तयार आहे स्टफ बालुशाही वर मस्त ड्रायफ्रूट्स ने सजावट करा
  16. बालुशाही फ्रीज मध्ये ठेवू शकता ८ ते १० दिवस खाऊ शकतो
  17. टिप
  18. बालुशाहीत सारण भरल्यावर सर्व बाजुंनी व्यवस्तीत बंद करून घ्यावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही
  19. बालुशाहीचे पीठ मळू नये हाताच्या बोटानी मिश्रण एकजीव करायचे आहे
  20. तूप हलकं गरम करून घ्या जास्त गरम तुपात बालुशाही फुगत नाही व कुशकुशीत होत नाही
  21. तुपऐवजी तेलात तळू शकता
  22. पाकात लिंबाचा रस घातल्याने पाकाचा रंग बदलत नाही
  23. पाक करत असताना साखर स्वच्छ नसेल किंवा गडद फेस आला की त्यात १ ते २ लहान चमचा दूध घालावे मग वर आलेला फेस काढून टाकावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Nov-04-2018
deepali oak   Nov-04-2018

तुमच्या पदार्थाचे पीक सोल्लिड असतात...:thumbsup:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर