Photo of Kaju Katli by Vaishali Joshi at BetterButter
702
5
0.0(0)
0

काजू कतली

Nov-06-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू कतली कृती बद्दल

सगळ्य़ानच्या आवडीची काजूकतली घरी केली आणि मन अगदी खुश झाले

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. काजू १२५ ग्राम
  2. साखर १ /२ कप
  3. मिल्क पावडर १/२ कप
  4. साजुक तूप १ चमचा
  5. रोज इसेंस १ चमचा
  6. चांदीचा वर्ख

सूचना

  1. काजू ची बारीक़ पावडर करून घ्या आणि चाळून घ्या (मिक्सर मधे काजू बारीक़ करत जायचे , चाळत जायचे असे पूर्ण बारीक़ पावडर करून घ्यावी )
  2. गैस वर कढईत साखर घालून ती बुडेल इतपत पाणी घालून एक तारी पाक करावा
  3. त्यात काजू पावडर घालून परतवा , २-३ मिनिटाने गैस बंद करा
  4. त्यात रोज इसेंस , मिल्क पावडर घालून छान मिळून घ्या आणि साजुक तूप घालून पुन्हा एकत्र घोटून घ्या ,थोड थंड करून घ्या
  5. ४-५ मिनिट थंड झाल्यावर एक प्लास्टिक शिट वर मिश्रण घालून गोळा मऊ होईस्तोवर मळून घ्या
  6. नंतर त्याच शिट वर गोळा लाटन्याने लाटून घ्या आणि वरून चांदीचा वर्ख लावा , तयार झाली आपली काजू कतली
  7. आवडीच्या आकारात काजू कतली कापून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर