मुख्यपृष्ठ / पाककृती / काजूच्या दिव्यांची मिठाई

Photo of CASHEWNUT diya by minal sardeshpande at BetterButter
478
5
0.0(0)
0

काजूच्या दिव्यांची मिठाई

Nov-08-2018
minal sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजूच्या दिव्यांची मिठाई कृती बद्दल

दिवाळी स्पेशल काजूच्या दिव्यांची मिठाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. काजूगर दीड वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. कोको पावडर दोन टीस्पून
  4. केशर सिरप किंवा केशरी रंग
  5. व्हाईट चॉकलेट
  6. दूध

सूचना

  1. एक वाटी काजूगर घेऊन पावडर करा.
  2. त्यात कोको पावडर मिसळा.
  3. कढईत अर्धी वाटी साखर घ्यावी.
  4. त्यात पाव वाटी पाणी घालावे.
  5. साखर विरघळून घ्यावी.
  6. विरघळली की कोको मिश्रित काजू पावडर त्यात मिसळावी.
  7. दोन मिनिटं ढवळत राहावे.
  8. मिश्रण घट्ट होऊ लागले की खाली उतरून घोटावे.
  9. गोळा झाला की ताटात काढून घ्यावा.
  10. छोटी गोळी घेऊन त्याला दिव्याचा आकार द्यावा.
  11. सगळे दिवे करून घ्यावेत.
  12. तयार दिवे
  13. उरलेले अर्धी वाटी काजूगर पावडर करून घ्यावे.
  14. कढईत पाव वाटी साखर घ्यावी.
  15. अगदी थोडं पाणी घालून साखर विरघळू द्यावी.
  16. तयार काजू पावडर आणि अगदी थोडा केशरी रंग घालून ढवळावे.
  17. घट्ट होऊ लागलं की खाली उतरून घोटावे.
  18. छोट्या छोट्या दिव्याच्या वाती कराव्या.
  19. तयार दिवे आणि वाती
  20. व्हाईट चॉकलेट कंपाऊंड चे दोन तुकडे घेऊन त्याचे बारीक तुकडे करावे.
  21. थोडे दूध घालून डबल बॉयलर पध्दतीने वितळवून घ्यावे.
  22. तयार दिव्यात वितळलेले चॉकलेट घालावे.
  23. चॉकलेट थोडे घट्ट झाले की त्यात वात ठेवावी. काजूच्या दिव्यात काजूच्या वाती चॉकलेटच्या तुपात उजळल्या ज्योती!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर