मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा चमचम डिलाईट

Photo of Semolina Chamcham Delight by Shraddha Juwatkar at BetterButter
453
5
0.0(0)
0

रवा चमचम डिलाईट

Nov-10-2018
Shraddha Juwatkar
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा चमचम डिलाईट कृती बद्दल

भाऊबीजेसाठी खास बनवली घरगुती चमचम मिठाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 ग्लास दूध
  2. 2 टेबलस्पून साजुक तूप
  3. 4 टेबलस्पून साखर
  4. 1/2 कप बारीक रवा
  5. 2 थेंब रोझ रेड कलर
  6. 5 कप पाणी
  7. 1 कप साखर
  8. 2 छोटी वेलची
  9. स्टफींग साठी 1 टीस्पून तूप
  10. 1/2कप दूध
  11. 1/2 कप दुधाची पावडर
  12. 1 टेबलस्पून पिठी साखर
  13. सजावटीसाठी डेसिकेटड कोकोनट पावडर व बदामाचे काप

सूचना

  1. एका पॅन मध्ये दूध गरम करत ठेवावे व त्यात 2 टेबलस्पून तूप घालून ढवळावे. मग साखर घालून पुन्हा ढवळत राहावे दुधाला उकळी आली की त्यात थोडा थोडा रवा घालून मंद आचेवर ढवळत राहावे व कलर घालावा. मिश्रण पॅनला सुटू लागले म्हणजेच गोळा तयार होत आला की गॅस बंद करावा व मिश्रण एका ताटात काढुन ठेवावे.
  2. गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी गरम करत ठेवावे व त्यात साखर घालून साखर विरघळे पर्यंत मधून मधून ढवळत राहावे. पाक अजिबात करु नये. वेलची टाकून गॅस बंद करावा.
  3. हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे लांबसर चमचमच्या आकारात गोळे तयार करावेत
  4. तयार केलेले गोळे साखरेच्या पाण्यात 15 मिनिटे बुडवून ठेवायचे.
  5. गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यात थोडे तूप घालून दूध घालावे व मिक्स करून घेणे आता त्यात दूधाची पावडर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे व पिठी साखर घालावी .मिश्रण पॅन सोडू लागले की गॅस बंद करावा. हे झाले आपले स्टफींग तयार.
  6. चमचमचे गोळे एका ताटात काढुन त्याला सुरीने मधोमध चिर देऊन वरील स्टफींग त्यात भरणे व डेसिकेटड कोकोनट मध्ये घोळवून आपल्या आवडीनुसार बदामाचे काप लावून सजवावे.
  7. फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर