मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन-पोहे मिश्रीत चविष्ट लाडू

Photo of Besan-Pohe Ladoo by Manisha Lande at BetterButter
626
3
0.0(0)
0

बेसन-पोहे मिश्रीत चविष्ट लाडू

Nov-10-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन-पोहे मिश्रीत चविष्ट लाडू कृती बद्दल

चविष्ट आणिक पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी बेसन
  2. १ वाटी पातळ पोहे
  3. साजूक तूप आवश्यकतेनुसार
  4. ७ ते ८ काजू तुकडे
  5. ७ ते ८ पिस्ता तुकडे
  6. ४ ते ५ बदाम तुकडे
  7. ४ ते ५ अक्रोड तुकडे
  8. १ मोठा चमचा चारोळी
  9. १/२ मोठा चमचा मनुका / बेदाणे
  10. पीठी साखर आवडीनुसार
  11. १ छोटा चमचा वेलची पूड
  12. चिमुटभर मीठ

सूचना

  1. प्रथम पोहे थोडे भाजून मिक्सरमधून बारीक दरदरीत वाटून घेतले.
  2. कढईत साजुक तुप घालून ते गरम झाल्यावर त्यात बेसन व चिमूटभर मीठ घालुन छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतले व बाजूला ठेवले.
  3. नंतर कढईत पुन्हा थोडं तुप घालून ते गरम झाल्यावर त्यात काजू, बदाम, पिस्ता, अक्रोडचे तुकडे व चारोळी थोडावेळ परतून घेतले.
  4. नंतर त्याच तुपात मनुका फुलेपर्यंत थोडया परतल्या.
  5. मिक्सरमध्ये काजू-बदाम-पिस्ता-अक्रोड यांची बारीक पूड करुन घेतली.
  6. एका पसरट परातीत भाजलेलं बेसन, वाटलेले पोहे पावडर, ड्रायफ्रुटस पुड, चारोळी, मनुका, वेलची पूड घालून सर्व छान एकजीव करून घेतले.
  7. नंतर त्यात आवडीनुसार पीठी साखर घालून सर्व पुन्हा छान एकजीव करून घेतले.
  8. नंतर त्यात थोडं थोडं तुप गरम करून घालून लाडू वळून घेतले.
  9. "बेसन-पोहे मिश्रीत चविष्ट लाडू" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर