पोहे उन्हात सुकवावे, निवडून घ्यावे. शेंगदाणे भाजणे आणि थंड झाल्यावर चोळून सालं काढून घेणे. नंतर एका पातेल्यात गॅसवर तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात शेंगदाणे,डाळं टाकून परतणे नंतर कढीपत्ता घालावा तो कुरकुरीत झाल्यावर जीरे, हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे टाकावेत थोडे परतलेकी चवीनुसार मीठ घालावे व चमचाभर साखर घालून पुन्हा परतावे,व हळद घालून चांगले हलवावे आणि पोहे घालून चांगले दहा मिनिटे मध्यम गॅसवर परतत राहावे. अशाप्रकारे मस्त चटपटीत पातळ पोहे चिवडा तयार
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा