BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाच्या पिठाचा ढोकळा

Photo of Rice flour dhokla by Rohini Rathi at BetterButter
237
2
0(0)
0

तांदळाच्या पिठाचा ढोकळा

Nov-19-2018
Rohini Rathi
360 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाच्या पिठाचा ढोकळा कृती बद्दल

ही रेसिपी माझी आजी बनवायची बनवण्यास खूप सोपी व चविष्ट अशी तांदळाच्या पिठाची ढोकळे ती नेहमी बनवायचे तीच पाककृती वापरून मीही ढोकळे बनवले आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन कप जाडसर तांदळाचे पीठ
  2. एक कप बेसन पीठ
  3. दही एक कप
  4. मीठ चवीनुसार
  5. सोडा अर्धा टी स्पून
  6. तेल एक चमचा
  7. हळदी चिमुटभर
  8. फोडणीसाठी
  9. बारीक किसलेले खोबरे दोन चमचे
  10. तेल दोन चमचे
  11. जिरे मोहरी हिंग एक चमचा
  12. कढीपत्ता पाच ते सहा पाने
  13. लसूण हिरवी मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  14. तीळ तीन टेबलस्पून
  15. साखर दोन चमचे
  16. मीठ चवीनुसार
  17. सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम तांदळाचे पीठ बेसन दही एकत्र करून सहा तास भिजवून ठेवावे
  2. नंतर त्यात चवीनुसार मीठ तेल हळद पाणी व सोडा घालून मिश्रण फेटून घ्यावे
  3. ताटाला तेल लावून तयार मिश्रण त्यात घालावे
  4. कढाई मध्ये पाणी गरम करून तयार होतात त्यात ठेवून मध्यम आचेवर ढोकळे दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे
  5. मिक्सरमध्ये किसलेले खोबरे लसूण हिरवी मिरची आलं वाटून घ्यावे
  6. कढईमध्ये तेल गरम करून तयार वाटण परतून घ्यावे
  7. नंतर त्यात कढीपत्ता पाणी तीळ व साखर घालून मिश्रणाला उकळी आणून द्यावे
  8. मीठ घालावे
  9. ढोकळे वाफ आल्यानंतर त्याचे चौकोनी आकारात तुकडे करून घ्यावे
  10. तयार ढोकळ्याची तुकडे वाटण्याच्या मिश्रणात घालून परतून घ्यावे
  11. सर्व बाजूने मसाला लागल्यानंतर दोन मिनिटं परतून घ्यावे
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चटणीबरोबर सर करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर