मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीची हातावरची भाकरी आणि खलबत्त्यातली शेंगदाणा चटणी

Photo of Hand made Jwari bhakri and morter pestal penut chatni by archana chaudhari at BetterButter
1820
2
0.0(0)
0

ज्वारीची हातावरची भाकरी आणि खलबत्त्यातली शेंगदाणा चटणी

Nov-19-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीची हातावरची भाकरी आणि खलबत्त्यातली शेंगदाणा चटणी कृती बद्दल

लहानपणी आजीला हातावर भाकरी करतांना बघून खूप छान वाटायचं....मजा यायची...आज मी केलीय आजीची खूप आठवण आली आजीच्या हातची खलबत्यात कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी म्हणजे अहाहा:yum::yum:तुम्ही पण नक्की करून पहा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारीच्या भाकरी साठी
  2. ज्वारीचे पीठ २ कप
  3. मीठ १/२टीस्पून
  4. कोमट पाणी १/२ ग्लास
  5. शेंगदाणा चटणीसाठी
  6. शेंगदाणे १ कप भाजून घेतलेले
  7. लसूण १२ पाकळ्या
  8. लाल सुक्या मिरच्या ४ भाजून घेतलेल्या
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ज्वारीच्या भाकरी साठी ज्वारीच्या पीठात मीठ,कोमट पाणी टाकून भिजवून घ्या.
  2. एक गोळा हातावर घ्या.
  3. त्याला डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या चार बोटांनी त्या गोळ्याला मोठे करा.
  4. थोडे हाताला पीठ लावून भाकरी मोठी करावी.
  5. काठाची बाजू पण एकसारखी करून घ्यावी.
  6. गरम तव्यावर टाका आणि थोडे पाणी लावा.
  7. दोन्ही बाजूंनी झाल्यावर गॅस वर शेकून घ्यावी.
  8. आता चटणीसाठी सगळे साहित्य घ्या.मिरचीचे देठ काढा.
  9. खलबत्त्यात कुटा.
  10. याप्रमाणे...
  11. शेंगदाण्याची मस्त चटणी तयार आहे.
  12. भाकरीवर चटणी टाकून खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर