मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टीक थालीपीठ

Photo of Thalipeeth by Pratiksha Jadhav at BetterButter
790
3
0.0(0)
0

पौष्टीक थालीपीठ

Nov-20-2018
Pratiksha Jadhav
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टीक थालीपीठ कृती बद्दल

आजी थंडीच्या दिवसात सर्व भाज्या घालून लुसलुशीत थालीपीठ बनवायची आणी वर लोण्याचा गोळा घालुन खायला द्यायची.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ,गहू,ज्वारी,बाजरी,मका,कुळीथ,मुग,मटकी,हरभरे,चणाडाळ,उडीदडाळ,मूगडाळ प्रत्येकी 1वाटी ही सर्व धान्य व डाळी भाजुन भाजणी एकत्र बारीक दळुन आणणे.
  2. भाजणीचे पीठ 2 वाट्या
  3. 1/4 वाटी काेबी
  4. 1/4 वाटी मेथीची पाने
  5. 1/4वाटी किसलेला गाजर
  6. 1/4वाटी काेथिंबीर
  7. 1 कांदा
  8. 1 टोमॅटो
  9. 1 चमचा आल मिरचीचा खर्डा
  10. 1/2 चमचा हळद
  11. 1 चमचा लाल तिखट
  12. 1/4 चमचा हिंग
  13. 2 चमचे तीळ
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल
  16. पाणी पीठ भिजवण्यासाठी
  17. लाेणी किंवा बटर
  18. दही

सूचना

  1. काेबी, मेथीची पाने, काेथिंबीर, कांदा, टोमॅटो सर्व बारीक चिरून घेणे.
  2. चिरलेल्या भाज्या, गाजर, भाजणीचे पीठ, आल, मिरचीचा खर्डा, हळद, तीळ, तिखट, हिंग, मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालुन सरसरीत पीठ भिजवावे.
  3. पॅनमध्ये तेल घालुन थालीपीठ थापावे.
  4. झाकण ठेवुन थालीपीठ दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्यावे.
  5. पलटल्यानंतर झाकण काढावे.
  6. लाेणी किंवा बटर घालून दही बराेबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर