मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठ पेरून शिमला मिरची

Photo of Simla mirch in besan by Suraksha Pargaonkar at BetterButter
823
1
0.0(0)
0

पिठ पेरून शिमला मिरची

Nov-22-2018
Suraksha Pargaonkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठ पेरून शिमला मिरची कृती बद्दल

माझी आजी ब-याच भाज्या बेसनपिठ पेरून करायची...कांद्याची पात,मेथी...त्यातली मला आवडणारी ही एक भाजी...तुम्हाला नक्की आवडेल....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ मध्यम आकाराच्या सिमला मिरची
  2. १ बारीक चिरलेला कांदा
  3. १/२ चमचा मोहरी
  4. १/२ चमचा जिरे
  5. ४ ते५ कडीपत्ता पाने
  6. १ चमचा लाल तिखट
  7. १/२ चमचा हळद
  8. १चमचा धनेपूड
  9. १ चमचा जिरेपूड
  10. १चमचा लिंबूरस
  11. ३ चमचे बेसन
  12. ३चमचे तेल
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. शिमला मिरची चिरून घ्या... एकदम पण बारीक चिरू नका...
  2. कढईत गरम तेलात मोहरी, जिरे, कडीपत्ता यांची फोडणी करून घ्या.. त्यात कांदा घालून परता..
  3. नंतर शिमला मिरची घालून परता..
  4. मिरची भाजली की त्यात हळद, तिखट, मीठ, जिरे पूड, धने पूड घालून मिसळा...
  5. वरून लिंबू रस घाला...
  6. शेवटी वरून बेसनपीठ घालून एक वाफ काढा...
  7. भाजी तयार...
  8. गरमागरम चपाती सोबत सव्हॆ करा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर