Photo of Funke Kadhi. by Triveni Patil at BetterButter
1681
5
5.0(0)
0

Funke Kadhi.

Nov-22-2018
Triveni Patil
330 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. १.तुरी ची दाळ १ वाटी.
  2. २. चवळीची दाळ पाऊण वाटी.
  3. ३.मुगाची दाळ अर्धी वाटी.
  4. ४.७/८ हिरव्या मिरच्या.
  5. ५.२मोठे कांदे बारिक चिरुन.
  6. ६.लसुण १८/२० पाकळ्या.
  7. ७.आलं १ इंच.
  8. ८.मुठभर जिरं.
  9. ९.वाटी भर कोथिंबीर बारिक चिरुन.
  10. १०.एक पाव चिवळची भाजी साफ करुन.
  11. ११.१ टिस्पुन हळद.
  12. १२.१ डाव तेल.
  13. १३. चवी पुरते मीठ.

सूचना

  1. १. तुरीची, चवळीची, आणी मुगाची दाळ २,३ पाणी धुवुन ४/५ तास वेगवेगळ्या भिजत घाला. २. ४/५ तासांनंतर भिजवलेल्या दाळी चाळणीत काढुन ३/४ मिनीट पाणी निथरु द्या.
  2. ३.मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या दाळी पैकी मावेल तेवढी दाळ घेवुन कमीत कमी पाणी घालुन बारिक वाटुन घ्या. नंतर उरलेली दाळ वाटुन घ्या.
  3. ५.आता वाटलेल्या दाळीत बारिक चिरलेला कांदा, धुवुन सफ केलेली चिवळची (घोळ) भाजी, कोथिंबीर, जिरं,आलं,लसुण,हि. मिरची पेस्ट, डाव भर तेल व चवीपुरते मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थीत मिक्स करा
  4. ६.एका पातेल्यात किंवा स्टिमर मध्ये पाणी घालून गरम करा, दुसरी कडे चाळणीला तेलाचा हात लावुन दाळीच्या वाटणाचे मुठी ने गोळे तयार करुन फुणके तयार करुन चाळणीत ठेवा व चाळणी पातेल्यावर ठेवुन वाफवुन घ्या.
  5. ७.फुणके तयार झाले आहेत की नाही हे बघण्यासाठी टुथपीक किंवा सुरी घालुन बघा. टुथपीक क्लिन निघाली म्हणजे फुणके तयार झाले की गरम गरम फुणके कढी बरोबर सर्व्ह करा.
  6. ८. हे फुणके चिवळची भाजी नसेल तर जास्तीच कांदा व जास्तीची कोथिंबीर चे पण खुप छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर