Photo of Zunzurmas bet by Nivedita Walimbe at BetterButter
638
2
5.0(0)
0

Zunzurmas bet

Nov-22-2018
Nivedita Walimbe
45 मिनिटे
तयारीची वेळ
105 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. बाजरीचे पीठ भाकरीसाठी
  2. मीठ चवीनुसार
  3. पांढरे तीळ एक वाटी
  4. लोणी दोन वाट्या
  5. शेंगदाणे भाजलेले दोन वाट्या
  6. वांगी छोटी एक किलो
  7. कांदे मोठे चार
  8. कांदा लसूण मसाला दोन चमचे
  9. गोडा मसाला एक चमचा
  10. शेंगदाणे कूट एक वाटी
  11. सुके खोबरे दोन वाट्या
  12. लसूण पाकळ्या पंधरा ते वीस
  13. लाल तिखट दोन चमचे
  14. तेल आवश्यकतेनुसार
  15. पाटवड्यासाठी बेसन पीठ दोन वाट्या
  16. जिरे तीन चमचे
  17. फोडणीचे साहित्य
  18. गुळ थोडासा
  19. कोथिंबीर बारीक चिरून एक वाटीभर
  20. पालक एक जुडी निवडून उकडून घेणे
  21. ताक तीन वाट्या
  22. पाणी आवश्यकतेनुसार
  23. गाजर पाच सहा
  24. सायीचे दही एक वाटी
  25. मीठ, साखर थोडी कोशिंबीरसाठी

सूचना

  1. लसूण चटणीसाठी एक वाटी खोबरे खिसुन जरा भाजून घ्यावे
  2. त्यात आठदहा लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, थोडे जिरे घालून चटणी बनवावी
  3. ताजे ताक करून लोणी काढून ठेवावे
  4. शेंगदाणे खमंग भाजून ठेवावेत व त्यातील थोडे कूट करावे
  5. वांगी फक्त मध्ये चार काप देऊन पाण्यात टाकून ठेवावीत
  6. कांदे बारीक चिरून घ्यावेत
  7. खोबरे खिसुन घ्यावे व बारीक करावे
  8. लसूण जिरे एकत्र बारीक करावे
  9. कांदे, खोबरं, शेंगदाणे कूट, लसूण जिरे पेस्ट,, कांदा लसूण मसाला व गोडा मसाला, मीठ चवीनुसार हे सर्व एकत्र करून हा मसाला प्रत्येक वांग्यामध्ये भरून घ्यावा
  10. तेलाची फोडणी करून त्यात ही वांगी एक एक करून सोडावी
  11. थोडे अर्धी वाटी पाणी घालून वांगी शिजवून घ्यावी
  12. वरून कोथिंबीर घालावी
  13. मधेच पाटवड्या करून घ्याव्या
  14. पालकाची ताकातली पातळ भाजी करावी
  15. गाजर खिसुन त्यात सायीचे दही, मीठ साखर घालून बनवावी
  16. तीळ लावून बाजरीच्या पातळ भाकरी बनवाव्या
  17. हे सर्व पदार्थ प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून सर्व्ह करावे
  18. असा हा फक्कड झुंझुरमास बेत सर्वांनी गप्पा मारत आस्वाद घ्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर