Photo of "Dangar"of udid dal by Suraksha Pargaonkar at BetterButter
1774
1
0.0(0)
0

डांगर

Nov-23-2018
Suraksha Pargaonkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डांगर कृती बद्दल

ही एक पारंपारीक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे.भाजी बनवायला काही नसल्यास चपाती किंवा भाकरीसोबत खायला बनवता येते..लगेच बनते...माझी आजी बनवायची नि माझी आई सुद्धा बनवते..

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी भाजून बारीक भरडलेली उडीद डाळ
  2. पाउण वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. १/२ वाटी कोथिंबीर
  4. ५/७ लसूण पाकळ्या व १/२चमचा जिरे एकत्र ठेचून
  5. १/२ चमचा हळद
  6. १ चमचा कांदा लसूण चटणी
  7. २ चमचे तेल
  8. चवीनुसार मीठ
  9. यथावश्यक पाणी

सूचना

  1. प्रथम उडीद डाळ भाजून घ्या
  2. गार झाल्यावर मिक्सरमधून भरडून घ्या.. खूप बारीक पीठ करू नका...
  3. नंतर इतर सर्व साहित्य एकत्र गोळा करून घ्या
  4. एका बाउल मध्ये सर्व घटक एकत्र करा नि आधी सुके मिसळून घ्या...
  5. नंतर गरजे प्रमाणे पाणी मिसळून थोडे घट्टसर करून घ्या..
  6. शेवटी कोथिंबीर घाला व पुन्हा एकदा मिसळून घ्या..
  7. गरमगरम भाकरी सोबत हे डांगर सर्व्ह करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर