मुख्यपृष्ठ / पाककृती / Jwari popcorn tart with rabdi

Photo of Jwari popcorn tart with rabdi by Swati Kolhe at BetterButter
908
6
0.0(2)
0

Jwari popcorn tart with rabdi

Nov-23-2018
Swati Kolhe
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. आतील सारण बनवण्यासाठी:
  2. गूळ १ कप
  3. ज्वारी लाह्या पीठ २ १/२ कप
  4. मीठ २ चिमूट
  5. तूप १/२ tsp
  6. वेलची १/८ tsp
  7. पाणी १ कप
  8. बाहेरील आवरणासाठी:
  9. गव्हाचे पीठ १/२ कप
  10. मीठ २ चिमूट
  11. तूप १/२ tsp
  12. रबडी १/२ कप
  13. सजावटीसाठी:
  14. बदाम(बाकी ऐच्छिक)

सूचना

  1. आतील सारण बनवण्यासाठी:
  2. पॅनमध्ये तूप,गूळ व पाणी, वेलचीपूड घालून त्याचे पाणी बनवून घ्या व एक उकळी येऊ द्या.
  3. गुळाच्या पाण्याला उकळी आली की ज्वारी लाह्यांचे पीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. गुठळी होऊ देऊ नये.
  4. एक वाफ आली की सारण डिश मध्ये काढून थंड होऊ द्यावे.
  5. बाहेरील आवरण बनवण्यासाठी:
  6. कणिक, तूप व मीठ घालून घट्ट कणिक मळून १० मिनिट मुरत ठेवा.
  7. आता कणकेच्या पुरी एवढे गोळे बनवून झाकून ठेवा.
  8. कणकेचा एक गोळा घेऊन छोटी परी बनवून त्यात वरील लाह्यांचे सारण भरून छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
  9. आता या पुऱ्या मी पुरणपोळी सारख्या तूप लावून शेकून घेतल्यात.
  10. सर्व्ह करताना पुऱ्यांवर तूप घालून दुधासोबत सर्व्ह करा.
  11. वरील रेसिपी माझ्या आजीची झाली. आता टार्ट कसे बनवायचे ते पाहू:
  12. माझ्याकडे कडे टार्ट मोल्ड नसल्यामुळे मी वाटीने घरीच टार्ट बनवले.
  13. छोट्या वाटीला आतून तूप/तेल लावून त्यावर वरील लाटलेल्या कच्च्या पुऱ्या ठेवून त्या आतील बाजून व्यवस्तीथ सेट करून घेतल्यात व बाहेर आलेले कापून घेतले.
  14. तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर कुकर ची जाळी ठेऊन त्यावर वाटी ठेवली व वरून झाकण ठवून ७-७ मिनिट उलट पालट बेक करून घेतल्यात.
  15. ओव्हन असल्यास ३-४ मिनिट मध्ये बेक होऊ शकते.
  16. आता हे तयार टार्ट तुम्ही दुधासोबत सर्व्ह करू शकता.
  17. किंवा टार्ट मध्ये रबडी भरून वरून बदामाचे काप व अख्खे बदामने सर्व्ह करू शकता.
  18. टीप: मी रबडी बनवताना अगदी १ tsp साखर घातली व २ tsp ज्वारीच्या लाह्या घातल्यात. साखर कमी घातली, कारण आधीच लाह्यांचे सारण गोड असते.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Atul Kumar
Nov-24-2018
Atul Kumar   Nov-24-2018

Chan sundar.....

Arya Paradkar
Nov-24-2018
Arya Paradkar   Nov-24-2018

Chanach

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर