मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची साबुदाणा पापडी

Photo of Upvasachi Sabudana Papdi by Renu Chandratre at BetterButter
0
3
0(0)
0

उपवासाची साबुदाणा पापडी

Nov-24-2018
Renu Chandratre
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची साबुदाणा पापडी कृती बद्दल

माझी आजी नेहमीच बटाट्याचे चिप्स, साबुदाण्याच्या पापड्या आणि कीस घरीच करायची , कधीच बाहेरून विकत नाही आणल्या। ती नेहमी उन्हाळ्यात वर्ष भराचे वाळवण करायची , जे आम्ही लोक फस्त करायचो , आता त्या फक्त आठवणी। पण आता ती परंपरा माझी आई पुढे वाढवत आहे , मागे ती माझ्या कडे आली, तेंव्हा आम्ही दोघींनि पुन्हा साबुदाण्याचा पापड्या केल्या। उपासाला किंवा इतर वेळीही मस्तच लागतात ।चहा कॉफी बरोबर मज्जाच। आजीची तीच रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करत आहे।

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • इंडियन
 • सिमरिंग
 • व्हिस्कीन्ग
 • बॉइलिंग
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

 1. साबुदाणा 2 वाटी
 2. मीठ 2 चमचे
 3. जीरे 2 चमचे
 4. पाणी 4 कप

सूचना

 1. साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्या
 2. चारपट पाणी घालून 4-5 तास भिजवून ठेवा , व्यवथित फुगला पाहिजे
 3. आता यात आजून 3-4 कप पाणी घालून , शिजवत ठेवा
 4. मंद आचेवर सतत ढवळत राहावे , नाही तर तळाशी जळू शकतो
 5. मीठ घालून अजून जर वेळ शिजू द्यावे , मिश्रण एकजीव झाले पाहिजे
 6. गॅस बंद करून , त्यात जिरे घाला
 7. एका सुती कपडावर किंवा प्लास्टिक शीट वर , आवडीनुसार लहान किंवा मोठ्या पापड्या पळीने घालाव्या
 8. 4 ते 5 दिवस , कडक उन्हात वाळवून घ्यावे
 9. नंतर साबुदाणा पापड्या एका मोठ्या भांड्यात काढून , अजून 2 ते 3 दिवस व्यवस्थित वाळवून घ्या
 10. शेवटी हवाबंद डब्यात भरून ठेवा
 11. आणि गरजेनुसार काढून , गरम तेलात किंवा तुपान तळून खायला द्यावे
 12. फराळाचे आनंद म्हणजेच, घरी बनवलेली साबुदाणा पापडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर