Photo of Kokam kadhi by Shraddha Juwatkar at BetterButter
764
3
0.0(0)
0

सोलकढी

Nov-25-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

चिकन ताट सोलकढी शिवाय अपूर्ण आहे असे आमची आजी नेहमी म्हणायची.आम्हाला पण तिच सवय लागली जेव्हा ही घरात चिकन किंवा मटणाचा बेत असतो तेव्हा सोलकढी हमखास बनवलीच जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 6

  1. 5/6 कोकम
  2. 1 नारळाचा चव (खोवलेले ओले खोबरे)
  3. 4/5 लसूण पाकळ्या
  4. एक टीस्पून आले
  5. 2/3 हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पून जिरे
  7. पाणी
  8. चवीनुसार मीठ व किंचित साखर
  9. सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. सर्वात प्रथम एका बाऊल मध्ये गरम पाणी घेऊन त्यात कोकम पंधरा मिनिटे भिजत ठेवावी म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल व कलरही छानपैकी येतो.
  2. किसलेले खोबरे , हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे व १ कप पाणी मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून किंवा गाळणीतून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दूध निघतं.
  3. या मध्ये भिजलेली कोकम पाण्यासहीत घालावे. मिठ व किंचित साखर घालावी
  4. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा वाढताना कोकम काढून टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर