मुख्यपृष्ठ / पाककृती / अळशी ची चटणी

Photo of Alsi Chutney/ Flexseeds dry chutney by Renu Chandratre at BetterButter
864
2
0.0(0)
0

अळशी ची चटणी

Nov-25-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळशी ची चटणी कृती बद्दल

अळशी मधे प्रचुर मात्रात ओमेगा- 6 असतो, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतो आणि हृदया साठी टॉनिक चे काम करतो । ही माहिती आपल्याला आता कळून आली पण आजी अळशी चा वापर किती तरी वर्षांपासून करत होती। मुखवास, भाजीत आणि ओली किंवा सुकी चटणी करण्यात।आज मी आजीची सुकी अळशी ची चटणी रेसिपी शेअर करत आहे । रोजच्या जेवणात थोडी थोडी वापरली तर आरोग्यासाठी फारच उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. जवस/ अळशी / फ्लेक्सीड्स 1 वाटी
  2. सफेद तीळ 1 मोठा चमचा
  3. लसूण पाकळ्या 15 ते 20
  4. जीरे 2 चमचे
  5. लाल तिखट 2 ते 3 चमचे
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम अळशी आणि तिळ , मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे
  2. पूर्णपणे गार होऊ द्या आणि त्यात ,लसून पाकळ्या, लाल तिखट, मीठ, जीरे मिक्स करा
  3. लाल तिखटा ऐवजी लाल सुक्या मिरच्या पण वापरू शकता
  4. आता सर्व साहित्य मिक्सर जार मधे घ्या आणि , सरसरीत पावडर करून घ्या
  5. पाहिजे असेल तर , बारीक पावडर पण करू शकता
  6. अळशी लसणाची सुकी चटणी तयार आहे
  7. गार झाली की हवाबंद बाटलीत भरून ठेवावी , 15 ते 20 दिवस खराब होत नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर