मुख्यपृष्ठ / पाककृती / 'पाटवडी' आणि 'पाटवडी रस्सा'

Photo of Patvadi by SUCHITA WADEKAR at BetterButter
1564
4
0.0(0)
0

'पाटवडी' आणि 'पाटवडी रस्सा'

Nov-28-2018
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

'पाटवडी' आणि 'पाटवडी रस्सा' कृती बद्दल

'पाटवडी' आणि 'पाटवडीचा रस्सा' माझी आजी बनवायची. पूर्वी माझ्या लहानपणी घरी कोणी पाहुणे येणार म्हटले की पाटवडी व पाटवडीचा रस्सा केला जायचा. हि पाटवडी अतिशय सुंदर लागते, आम्ही मुले तर नुसती खात असू. कधी कधी आजी हि पाटवडी थोड्याशा तेलावर परतून आम्हाला खायला द्यायची. आजी जेवताना डिशमध्ये दोन ते तीन पाटवडी ठेवायची आणि वरून पाटवडीसाठी केलेला रस्सा ओतायची आणि भाकरी किंवा चपतीसोबत वाढायची. सोबत कांदा आणि लिंबूही असे. पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा केला की आजीची आठवण मात्र नक्की होते. तर अशी ही झणझणीत पाटवडी आणि पाटवडी रस्सा आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेय नक्की try करा...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● पाटवडी साठी ....
  2. 1. एक वाटी बेसनपीठ
  3. 2. एक वाटी पाणी
  4. 3. हिरवी मिरची 3 ते 4
  5. 4. लसूण पाकळ्या 5 ते 6
  6. 5. आलं अर्धा इंच
  7. 6. जिरे अर्धा चमचा
  8. 7. मोहरी अर्धा चमचा
  9. 8. हिंग पाव चमचा
  10. 9. हळद पाव चमचा
  11. 10. मीठ चवीपुरते
  12. 11. तेल 1 चमचा
  13. 12. कोथिंबीर
  14. ● पाटवडी रस्सा .....
  15. 1. हिंग पाव चमचा
  16. 2. हळद पाव चमचा
  17. 3. कांदा+लसूण+आले+कोथिंबीर+खोबरे यांचे वाटण 1 वाटी
  18. 4. कांदा लसूण मसाला 1 चमचा
  19. 5. लाल मिरची पावडर अर्धा चमचा
  20. 6. चवीपुरते मीठ
  21. 7. पाणी

सूचना

  1. प्रथम पाटवडी बनवूयात. आलं+लसूण+मिरचीचे हिरवे वाटण बनवून घ्यावे.
  2. एका भांड्यात 1 चमचा तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि हिरवे वाटण घालून परतून घ्यावे आणि त्यात एक वाटी पाणी व चवीसाठी मीठ घालावे.
  3. यानंतर एक उकळी आली की त्यात एक वाटी बेसनपीठ घालावे व गुठळी होऊ न देता भर भर हलवावे आणि झाकण ठेवून 5 मिनिटे बारीक गॅसवर ठेवावे.
  4. पाच मिनिटांनी झाकण काढून वरून कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवावे आणि गॅस बंद करावा.
  5. एका ताटाला तेल लावून घ्यावे व हे मिश्रण त्यात घालून एकसारखे थापून घ्यावे.
  6. आता या थापलेल्या मिश्रणाच्या वड्या कापाव्यात.
  7. आणि एका प्लेट मध्ये काढून घ्याव्यात. आपली पाटवडी तैयार !
  8. आता पाटवडीचा रस्सा बनवूयात ....
  9. एका पातेल्यात 3 ते 4 चमचे तेल तापवून त्यात हिंग, हळद, कांदा+आले+लसूण+कोथिंबीर+खोबऱ्याचे वाटण घालावे
  10. आणि कांदा लसूण मसाला व लाल मिरची पावडर घालावी व चांगले परतून घ्यावे.
  11. यानंतर यात पाणी घालावे व मीठ घालून दोन ते तीन उकळी आणावी. आपला पाटवडी रस्सा तैयार !
  12. दोन्ही तैयार झाले की कांदा, लिंबू सोबत सर्व्ह करावी पाटवडी आणि पाटवडी रस्सा !!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर