मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Kothimbir vadi by Ujwala Surwade at BetterButter
1013
2
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Nov-30-2018
Ujwala Surwade
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

आजी मस्त डाळ भिजवून पाट्यावर वाटून बनवत असे .पाट्यावर वाटतांना तो सुगंध .आणि ताजी कोथिंबीर कापल्यानंतर चा सुगंध मला खूप आवडतो .पण आता काळानुसार सर्व बदलले सगळी कडे मिक्सर आणि आधुनिक यंत्रणा आल्यात .मी आपलं मिक्सर वापरले.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कोथिंबीर एक जूडी
  2. हरबरा डाळ एक वाटी
  3. हीरव्या मिरच्या ६/७
  4. लसूण १०/१२पाकळ्या
  5. आलं एक तुकडा
  6. धणे एक चमचा
  7. जिरं एक चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद एक टीस्पून
  10. हींग एक टीस्पून
  11. तेल
  12. चिमूटभर सोडा
  13. पाणी
  14. एक टीस्पून तीळ
  15. एक टीस्पून ओवा

सूचना

  1. प्रथम डाळ ४/५तास भिजत घालणे
  2. नंतर मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यावे .वाटतांना मिरच्या ,धने ,जिरे ,आलं ,लसूण वाटून एकत्र करून एका भांड्यात काढावे
  3. नंतर त्यात निवडून धुतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मीठ ,हळद, हिंग, ओवा, तीळ घालून मिक्स करून घ्यावे .
  4. एका भांड्यात पाणी घालून उकळायला ठेवा .चाळणी ला तेलाचा हात लावून घ्यावा.
  5. नंतर मिश्रणात चिमूटभर सोडा टाकून मिश्रण एकजीव करून वळकट्या बनवून घ्या.
  6. नंतर ह्या वळकट्या चाळणीत वाफवून घ्या आणि नंतर तेलात तळून घ्या .आणि तळल्यावर साँस बरोबर किंवा अश्या च गरमागरम खायला तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर