मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची पातळ भाजी

Photo of Methici patl bhaji by जयश्री जोशी at BetterButter
813
1
0.0(0)
0

मेथीची पातळ भाजी

Nov-30-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची पातळ भाजी कृती बद्दल

ही भाजी थोडी असेल तरी शिजवून भरपूर होते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. पावशेर किंवा छोटी अर्धी जुडी मेथी
  2. २टेबल स्पून चणाडाळ पीठ
  3. २ टेबल स्पून शेंगदाणे
  4. १ कांडी लसूण
  5. २,३हिरव्या मिरच्या
  6. ३टेबल स्पून तेल
  7. बाकी सर्व फोडणी साहित्य(जिर,मोहरी तिखट व हळद)
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम मेथी निवडून,धुवून घेणे.
  2. ती बारीक कापणे.
  3. १ पातेल्यात पाणी उकळत ठेवून त्यात थोडे तेल व हळद टाकून मेथी शिजवण्यासाठी ठेवणे
  4. शिजल्यानंतर त्यात शेंगदाणे,मिरची व थोडा लसूण बारीक करून घालने तसेच डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून भाजीत घालने व चवीनुसार गरज असल्यास मीठ घालावे.
  5. परत भाजी चांगली शिजू देणे.
  6. नंतर मग भाजीला लसणाचा तडका करणे.
  7. अशी ही चवदार भाजी गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर