मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचे घारगे

Photo of Gajar Gharage by Nivedita Walimbe at BetterButter
1881
2
0.0(0)
0

गाजराचे घारगे

Nov-30-2018
Nivedita Walimbe
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराचे घारगे कृती बद्दल

माझी आज्जी सुगरण होती, नेहमी छान छान पदार्थ बनवायची. हे पदार्थ पौष्टीक आणी पोटभरीचे असायचे. असाच एक पदार्थ म्हणजे घारगे, मग ते भोपळ्याचे असो की गाजराचे किंवा रताळ्याचे. पटकन होणारा पदार्थ म्हणजे घारगे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी गाजर खिस
  2. दीड वाटी गुळ
  3. चिमूटभर मीठ
  4. कणिक अंदाजे तीन वाट्या
  5. तळणीसाठी रिफाइंड तेल
  6. बारीक रवा पाव वाटी

सूचना

  1. गाजर खिस व गुळ एकत्र करून गुळ विरघळेपर्यंत गरम करावे.
  2. गार झाले की त्यात मीठ व रवा, कणिक घालून मळून घ्यावे.
  3. घट्ट गोळा करू नये, सैलसर असावे.
  4. दहा मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
  5. तेल गरम करून घ्यावे.
  6. प्लॅस्टिक कागदावर छोटे छोटे घारगे थापून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.
  7. हे गरम, गार कसेही चांगले लागतात.
  8. प्रवासात नेण्यासाठी उत्तम.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर