मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाच्या दुधातील खरवस

Photo of KHARVAS by minal sardeshpande at BetterButter
1502
4
0.0(0)
0

नारळाच्या दुधातील खरवस

Dec-01-2018
minal sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाच्या दुधातील खरवस कृती बद्दल

नारळाचं दूध आणि गूळ असं घालून केलेला खरवस जास्त खमंग लागतो आणि घरात साधं दूध नसेल तर विकत न आणता घरचे नारळ वापरून काम होतं.. आजीच्या सुगरण पणाचं अजून एक कौतुक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पहिल्या दिवसाचा चीक एक वाटी
  2. नारळाचं दूध सव्वा वाटी
  3. गूळ पाऊण वाटी
  4. जायफळ पावडर पाव टीस्पून
  5. केशर काड्या

सूचना

  1. दोन वाट्या ओलं खोबरं मिक्सरला पाणी घालून फिरवा
  2. गाळण्याने दूध गाळून घ्या.
  3. एक वाटी चिकात सव्वा वाटी दूध मिसळा.
  4. गूळ बारीक चिरून घ्या.
  5. आधी अर्धी वाटी मिसळून चव बघा.
  6. गोड पुढे लागेल असा गूळ हवा.
  7. लागला तर अजून घाला.
  8. एका डब्यात मिश्रण ओता.
  9. जायफळ पावडर केशर काड्या घाला.
  10. कुकरमध्ये खाली पाणी घालून प्लेट ठेवा.
  11. डबा झाकण लावून ठेवा.
  12. शिट्टी काढून 15 मिनिटं वाफवा.
  13. गार किंवा गरम सर्व्ह करा.
  14. तयार खरवस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर