मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकिन पारे

Photo of Namkeen Pare by Tejashree Ganesh at BetterButter
625
1
0.0(0)
0

नमकिन पारे

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकिन पारे कृती बद्दल

माझा आजी व आई ह्याच रेसिपीला शंकरपाळ्याच्या आकारात करत असे मी ह्याला थोडा twist दिला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. ओवा १ चमचा
  3. तिळ १/२ चमचा
  4. मिरे १/२ चमचा कुटून
  5. मिठ चविनुसार
  6. तेल २ चमचे मोहन करीता
  7. तेल तळण्याकरिता

सूचना

  1. मैदा, ओवा, तिळ, मिरे, मिठ व २ चमचे तेल (गार मोहन) सर्व एकत्र करून घेतले.
  2. पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला.
  3. १०-१५ मि. रेस्ट केले.
  4. नंतर पुन्हा मळून गोळे करून घेतले.
  5. एक गोळा लाटून घेतला.
  6. त्यावर तेल लावले व मैदा भूरभूरून त्याचा रोल तयार केला.
  7. ह्या रोलचे २-३ ईंच लांब काप केले.
  8. प्रत्येक काप उभा लाटला व त्याचे लहान लहान काप करून घेतले.
  9. आणि कढईमधे तेल तापवून तळून घेतले.
  10. तळून झाल्यानंतर किचन टॉवल वर काढून घेतले.
  11. हवाबंद डब्यात भरून ठेवावे आठवडाभरही चांगले राहतात.
  12. चहा सोबत, किंवा मधल्यावेळेत, प्रवासाला छान नाष्टा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर