Photo of Dind by Tejashree Ganesh at BetterButter
406
0
0.0(0)
0

दिंड

Dec-02-2018
Tejashree Ganesh
40 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दिंड कृती बद्दल

दिंड हा प्रकार आजी नागपंचमी ला करीत असे, चिकोल्या तिखट पदार्थ म्हणून व गोडात दिंड.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हरभरा डाळ १/२ कप
  2. गुळ १/२ कप
  3. गव्हाचे पिठ १ कप
  4. तेल
  5. मिठ चविपुरते
  6. वेलची पुड
  7. जायफळ पुड

सूचना

  1. हरभरा दाळ स्वच्छ करून शिजवून घेतली.
  2. त्यातील पाणी काढून घ्यावे व बाजूला ठेवावे.
  3. एका जाडबुडाच्या भांड्यात शिजलेली डाळ घोटून घ्यावी व गुळ टाकून पुन्हा शिजवावे.
  4. हे मिश्रण घट्ट झाले की बाजूला काढून घ्यावे.
  5. कोमट झाले की त्यात वेलची पुड व जायफळ पुड, सुका मेवा टाकावा.
  6. सर्व मिश्रण एकत्र करून गोळा करून घ्यावा.
  7. कणकेत चिमुटभर मिठ घालावे व तेलाचे कडकडीत मोहन घालून कणीक भिजवावी
  8. कणकेचा एक छाटा गोळा घेतला त्याला लाटून घेतले.
  9. ह्या गोळ्यावर पुरणाचा गोळा ठेवला.
  10. आता पोळीच्या एका बाजूने घडी घातली.
  11. आता पोळीच्या दुस-या बाजूने घडी घातली.
  12. नंतर वरून घडी घातली.
  13. आणि शेवटी खालच्या बाजूने घडी घातली.
  14. चोैकोनी दिंड तयार झाली.
  15. आता अशा प्रकारे सर्व दिंड तयार करून घेतल्या.
  16. एका भांड्यात पाणी ठेवून त्यामधे चाळणीवर सुती कपडा ठेवला व भांड्याला गॅसवर ठेवून पाण्याला वाफ येऊ दिली.
  17. त्यानंतर सर्व दिंडी कपड्यावर ठेवल्या व झाकण ठेवून वाफवून घेतल्या.
  18. दिंडी तयार झाल्यानंतर गरम-गरम serve केल्या जातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर