मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीे-दाळ वडे

Photo of Methi-Daal Vada by Tejashree Ganesh at BetterButter
814
1
0.0(0)
0

मेथीे-दाळ वडे

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीे-दाळ वडे कृती बद्दल

ही माझ्या आजीची रेसिपी, त्यावेळची innovative recipe म्हटलं तरी चालेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथीची गड्डी १ लहान
  2. हरभरा दाळ १ चमचा
  3. तुरदाळ १ चमचा
  4. मुगदाळ १ चमचा
  5. हिरव्या मिरच्या २-३
  6. लसून पाकळ्या ३-४
  7. हळद १/२ लहान चमचा
  8. मिठ
  9. तेल

सूचना

  1. प्रथम सर्व दाळी भिजत टाकल्या.
  2. ५-६ तासांनी पाण्यातून बाहेर काढून ठेवल्या.
  3. मेथी स्वच्छ करून घेतली व धुवून निथळत ठेवली.
  4. लसून-मिरची-मिठ कुटून घेतले.
  5. सर्व डाळी वाटून गोळा तयार केला. (ह्यात पाणी न घावता बारिक करावे)
  6. एक कढईत तेल तापवले व त्यात वाटलेली मिरची-लसून घालून परतून घेतले.
  7. नंतर त्यात मेथी टाकून थोडी परतून घेलती, (फार जास्त होऊ द्यायची नाही)
  8. त्यानंतर ह्याच मिश्रणामधे दाळींचे वाटण घातले, ( वेगळे शिजवून घेतले तरी चालते)
  9. त्यातले पाणी निघून गेले की हा गोळा एका ताटात काढून घेतला.
  10. लहान लहान चपटे गोळे करून घेतले.
  11. हे गोळे रव्याने किंवा bread crumbs ने कोट केले.
  12. आणि तेलात तळून घेतले. किंवा shallow fry केले तरीही चालतात.
  13. मधल्यावेळेत snacks म्हणूनही खाता येतात.
  14. ह्याबरोबर आजी दह्याची चटणी देत असे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर