मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटर मलाई पनीर

Photo of Methi matar malai paneer by seema Nadkarni at BetterButter
891
1
0.0(0)
0

मेथी मटर मलाई पनीर

Dec-04-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटर मलाई पनीर कृती बद्दल

हिवाळ्यात मेथी खूप छान मिळतात, हिरव्या पालेभाज्या मध्ये आयर्न पुष्कळ प्रमाणात असते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 जूडी मेथी
  2. 1 कप मटार
  3. 1/2 कप पनीर
  4. 1 कप बारीक चिरलेला कांदा
  5. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 1/2 कप दूधा ची मलाई
  7. 1/4 कप पाणी
  8. चवी पुरते मीठ
  9. 2 चमचा लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट
  10. 1 चमचा धणे जीरे पावडर
  11. 1/2 चमचा गरम मसाला

सूचना

  1. मेथीची जुडी साफ करून स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावी.
  2. कांदा बारीक चिरून घ्यावे.
  3. एका पातेल्यात पाणी घालून त्यात चीरलेली मेथी, मटार एकत्र करून उकळून घ्या.
  4. कढईत तेल तापवून त्यात जीरे ची फोडणी करून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  5. मेथी मटर च्या मिश्रणाचे पाणी गाळून घ्यावे. म्हणजे कडवट चव येत नाही.
  6. कांद्याच्या मिश्रणात मेथी मटर घालून एकत्र करावे.
  7. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट, धणे जिरे पूड, गरम मसाला घालून एकत्र करावे.
  8. आता त्यात मलाई घालून मिक्स करून घ्यावे. 1/4 कप पाणी घालून एकरस करून घ्यावे.
  9. त्यात छोटे छोटे पनीर चे तूकडे घालून एकत्र करावे.
  10. गॅस बंद करून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर