मुख्यपृष्ठ / पाककृती / हिवाळा स्पेशल मुगाचा शिरा

Photo of WINTER SPECIAL MOONG HALWA by Jayshree Bhawalkar at BetterButter
718
7
0.0(0)
1

हिवाळा स्पेशल मुगाचा शिरा

Dec-12-2018
Jayshree Bhawalkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिवाळा स्पेशल मुगाचा शिरा कृती बद्दल

ही हिवाळयात बनवली जाणारी पारंपरिक पाक कृती आहे.मुगाची डाळ पौष्टिक असल्या मुळे आणि भरपूर तूप, बदाम काजू घातल्या मुळे अजून पौष्टिक होतो असा हा शिरा हिवाळ्यात आवर्जून बनवला जात असतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • राजस्थान
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप पिवळी मूग डाळ
  2. 1 कप तूप
  3. 1 कप साखर
  4. 3 कप पाणी
  5. 3 चमचे काजू,बदाम चे काप
  6. 1 चमचा वेलची पूड

सूचना

  1. डाळ नीट धुवून ,पाण्यात 2 तास भिजत ठेवा
  2. आता पाणी पूर्ण काढून मिक्सर मधे बारीक वाटून घ्या
  3. एका कुकर च्या डब्याला 1/2 चमचा तूप लावून  घ्या केक साठी लावतो तसे आणि आता हे मुगाच वाटलेलं पिठ त्या डब्यात ओतून एका प्लेट नी झाकून कुकर मधे ठेवा आणि शिट्टी लावून 2 शिट्या होऊ द्या.
  4. कूकर थंड झाल्यावर शिलेल्या पिठा चे छोटे तुकडे करून परत मिक्सर मधे फिरवून घ्या.
  5. .एका कढईत 1/2 कप तूप गरम करा आणि हे वाटलेले,शिजलेले पिठ  त्यात घालून नीट मिक्स करा
  6. आता हे पिठ मंद आंचे वर 10 मिनिट भाजून घ्या.
  7. आता उरलेलं 1/2 कप तूप पण मिक्स करा.
  8. आता गॅस थोडासा मोठा करू शकतो पण सतत हालवत रहायचे
  9. 10 -12 मिनिटात पिठ तूप सोडू लागेल
  10. पिठा ला गडद कथ्थई रंग येई पर्यंत भाजायचे आहे. पिठ थोडं कुरकुरीत पण होणार.
  11. आता हे भाजलेले पिठ एका वाडग्यात काढून थंड होऊ द्या.
  12. थंड झाल्यावर परत एकदा मिक्सर मधून वाटून घ्या
  13. एका कढईत 3 कप पाणी त्यात 1 कप साखर घाला आणि मिक्स करा
  14. साखर विरघळून 2 उकळी येऊ द्या.
  15. आपलं भाजून वाटलेलं पिठ ह्यात नीट मिक्स करा
  16. नीट मिक्स करायचे गुठळ्या नाही असल्या पाहिजे
  17. हे शिराघट्ट होई पर्यंत शिजवून घ्या.
  18. शिरा हवा तसा घट्ट झाला कि त्यात वेलचीपूड, काजू बदामाचे काप घालून नीट मिक्स करा
  19. एका सर्व्हिंग डिश मधे वरून काजू,बदामाचे काप घालून सजवून हिवाळा स्पेशल मुगाचा शिरा  सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर