मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथाच्या शेंगोळ्या

Photo of Kulithacha Shengolya by kanchan date at BetterButter
433
0
0.0(0)
0

कुळीथाच्या शेंगोळ्या

Dec-15-2018
kanchan date
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथाच्या शेंगोळ्या कृती बद्दल

कुळीथ खूप गरम असतात त्यामुळे हि रेसिपि हिवाळ्यात केली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप कुळीथाचे पीठ
  2. 2 चमचे गव्हाचे पीठ
  3. 6-7 सुक्या लाल मिरच्या
  4. 12-15 लसूण पाकळ्या
  5. 3 चमचे शेंगदाण्याचा कूट
  6. 2 चमचे तेल
  7. अर्धा चमचा हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 4 कप पाणी

सूचना

  1. सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवा
  2. 15 मिनिटाने मिरच्या आणि लसूनची बारीक पेस्ट करून घ्या
  3. 1 चमचा पेस्ट बाजूला काढून ठेवा
  4. कुळीथ पीठ, गव्हाचे पीठ, थोडं मीठ,हळद मिरची आणि लसूनची पेस्ट मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या
  5. गॅस वर एक खोलगट भांड ठेऊन त्यात 3-4 कप पाणी घाला.
  6. त्यात 1 चमचा मिरची लसूनची पेस्ट, मीठ, आणि 2 चमचे तेल घालून पाण्याला उकळी काढून घ्या
  7. पाण्याला उकळी येई पर्यंत शेंगोळे वळून घ्या
  8. त्यासाठी पोलपटला आणि हाताला थोडं तेल लावून घ्या. मग थोडा पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर शेंगोळे वळून ते चकली प्रमाणे गोल करा
  9. मळलेल्या पीठ मधून थोडं पीठ बाजूला काढून ठेवा व बाकी सगळ्याचे शेंगोळे वळून घ्या
  10. आता उकळत्या पाण्यात एक एक करून शेंगोळे सोडा.
  11. 10-15 मिनिट मीडियम गॅस वर शिजू द्या. अधून मधून तळापासून ढवळत राहा.
  12. शेंगोळे शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट घाला आणि 2 मिनिटाने गॅस बंद करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर