Photo of Bharit Bhakri Bites by archana chaudhari at BetterButter
1197
4
5.0(0)
0

Bharit Bhakri Bites

Dec-15-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भरीतसाठी
  2. मोठे वांगे १ (भाजून घेतलेले)
  3. हिरवी मिरच्या ४( भाजलेल्या)
  4. लसूण पाकळ्या ४
  5. कोथिंबीर २ टेबलस्पून चिरलेली
  6. फोडणीसाठी
  7. जिरे १/२ टीस्पून
  8. ओवा १/४ टीस्पून
  9. शेंगदाणे १ टेबलस्पून(भाजून तुकडे करून)
  10. कांदापात ४ टेबलस्पून चिरलेली
  11. तेल २ टेबलस्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. भाकरीसाठी
  14. ज्वारीचे पीठ २ कप
  15. काळ्या उडीदाचे पीठ १/४ कप
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भाजलेल्या वांग्याचे साले आणि देठ काढा.
  2. भाजलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण ,कोथिंबीर जाडसर कुटून घ्या.
  3. वरील मिश्रणात च वांगेपण कुटून घ्या.
  4. कढईत तेल गरम करून त्यात जिरे,ओवा,शेंगदाणे, कांदापात घालून परतून घ्या.
  5. आता कुटलेले वांग्याचे मिश्रण घाला.
  6. मीठ घालून ५ मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा.
  7. भाकरीसाठी ज्वारीचे पीठ,काळ्या उडीदाचे पीठ,मीठ एकत्र करून कोमट पाण्याने भिजवून गोळा भिजवून घ्या.
  8. आता लहान लहान गोळे करून घ्या.
  9. एक गोळा घेऊन त्याला पुरीचा आकार द्या.
  10. वरील पुरीत तयार झालेले भरीत चमच्याने भरा आणि व्यवस्थित बंद करून घ्या.
  11. या प्रमाणे सगळे बाईट्स बनवून घ्या.
  12. कढईत तेल तापायला ठेवा.
  13. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भरीत भाकरी बाईट्स तळून घ्या.
  14. दह्यासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर