मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेली उसळ व भाताचे कबाब

Photo of USAL KABAB by Aditi Bhave at BetterButter
469
4
0.0(0)
0

उरलेली उसळ व भाताचे कबाब

Dec-18-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेली उसळ व भाताचे कबाब कृती बद्दल

उसळ व भात दोन्ही शिल्लक राहिले होते ते वापरून चटपटीत असे कबाब बनवले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तयार चवळी व मटकीची उसळ - 1 वाटी
  2. भात - अर्धी वाटी
  3. पोहे - 1 वाटी
  4. उकडलेले बटाटे - 2
  5. तिखट - चवीनुसार
  6. मीठ - चवीनुसार
  7. चाट मसाला - 1 चमचा
  8. कोथींबीर - मूठभर
  9. आलं - 2 इंच
  10. लसुण - 2 ते 3 पाकळ्या
  11. पालक - 10 - 12 पाने
  12. बारीक रवा - अर्धी वाटी
  13. तेल- तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. आलं लसूण पेस्ट करून घ्यावी.
  3. पालक, कोथिंबीर धुवून चिरून घ्यावे.
  4. उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावे.
  5. उसळ , भात, बटाटे , तिखट, चाट मसाला, मीठ , पालक, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, पोहे एकत्र करून घ्यावे.
  6. वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे.
  7. आता याचे लांबट आकाराचे कबाब करावेत.
  8. रव्यात घोळवून घ्यावेत.
  9. तेल तापवून घ्यावे.
  10. त्यात हे कबाब खरपूस तळून घ्यावेत.
  11. केचप बरोबर टूथपीक लावून सर्व्ह करावे.
  12. कबाब

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर