मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या ब्रेडचे दही सँडविच

Photo of Leftover Bread Curd Sandwich by Tejashree Ganesh at BetterButter
600
8
0.0(0)
0

उरलेल्या ब्रेडचे दही सँडविच

Dec-28-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या ब्रेडचे दही सँडविच कृती बद्दल

खुप सोपी आणि चविष्ट... अशी उरलेल्या ब्रेडची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. व्हाईट ब्रेड ४
  2. ब्राउन ब्रेड २
  3. दही १/२ वाटी
  4. मिठ
  5. मिरपुड २ चिमुट किंवा आवडी नुसार ( ऐच्छिक)
  6. बटर १ क्युब
  7. टोमॅटो सॉस सजावटीकरिता (ऐच्छिक)

सूचना

  1. प्रथम ब्रेडचे काठ कपून घेतले व दह्यामधे मिठ व मिरपुड टाकूण घेणे.
  2. सर्व साहित्य एका प्लेटमधे घेतले.
  3. व्हाईट ब्रेडवर दही लावून घेतले.
  4. एका ब्रेडच्या जोडीवर ब्राऊन ब्रेड ठेवले.
  5. उरलेले दोन ब्रेड ब्राऊन ब्रेडवर ठेवून सँडविच तयार करणे.
  6. गॅसवर तवा ठेवून तो थोडा तापला की त्यावर बटर लावून घेतले. (तवा फार तापवू नये.)
  7. लगेच त्यावर सँडविच ठेवावे.
  8. आणि उलत्न्याच्या किंवा प्लेटच्या साहाय्याने थोडे दाबून घेतले. (फार जास्त दाबू नये)
  9. ह्याचप्रकारे दुस-या बाजूनेही सँडविच दाबून घ्यावे.
  10. हे सँडविच दोन्ही बाजूंनी अशाचप्रकारे भाजून घेणे, ब्रेड मुळीच लाल होणार नाही ह्याची काळजी घेणे.
  11. नंतर एका प्लेटमधे त्याचे चौकोनी काप करून सजवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर