मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा मटकी भेळ

Photo of Sprouts Bhel.. by Triveni Patil at BetterButter
250
2
0.0(0)
0

चणा मटकी भेळ

Jan-06-2019
Triveni Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा मटकी भेळ कृती बद्दल

आपण मोड आलेल्या चणा मटकी ची भाजी किंवा मिसळ करतो पण जर मटकी जास्त भिजवली गेली तर ती उरते मग या चणा मटकीचे करायचे काय तर यावर एक सोपा आणी चटपटीत उपाय म्हणजे चणा मटकी भेळ जिभेचे लाड पुरवणारी व कडधान्य पोटात गेल्याचे समाधान.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

 1. १.मोड आलेली मटकी १ दिड वाटी.
 2. २. १. मि.साईज कांदा बारिक चिरुन.
 3. ३. १. मि. साईज टोमँटो बारिक चिरुन.
 4. ४. अर्धी वाटी दही.
 5. . १. टे.स्पुन चिंच गुळाची चटणी.
 6. ६. १. टि.स्पुन लाल मिरची पावडर.
 7. ७. १ टि.स्पुन हळद.
 8. ८. चवी पुरते मीठ.
 9. ९. १.लहान वाटी फरसाण.
 10. १०. कोथिंबीर बारिक चिरुन.
 11. ११. १. टे.स्पुन तेल.
 12. १२. अर्धा लिंबाचा रस.
 13. १३. चाट मसाला.

सूचना

 1. १. गँसवर एका कढईत पाणी घेवुन किंचीत मीठ घालून बाँईल करुन घ्या आता यात मोड आलेली मिक्स मटकी, चणे घेवुन उकळुन घ्या.
 2. २. उकडलेली चणे, मटकी थंड झाल्यावर पाणी निथरायला एका चाळणीत काढुन ठेवा. दुसरी कडे कढईत १. टे.स्पुन तेल घेवुन गरम करा.
 3. ३. या गरम तेलात पाणी निथरलेली चणे मटकी घालुन छान शँलो फ्राय करा. शँलो फ्राय करतांना किंचीत हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालावे, व गँस बंद करावा.
 4. ४. आता फ्राय केलेली चणा मटकी एका बाऊल मध्ये घेवुन त्यावर बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेला टोमँटो, चिंच गुळाची चटणी, दही किंचीत लाल मिरची पावडर, चाट मसाला घालून सर्व मिक्स करावे.
 5. ५. वरिल भेळ एका प्लेट मध्ये घेवुन त्यावर दही २. टे.स्पुन दही घालून वरुन फरसाण व बारिक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे व लिंबु रस मारके सर्व्ह करा चटकदार मटकी भेळ. काय मग सुटले ना तोंडाला पाणी मग प्लेटट कसली बघताय तयारी लागा आणी तुम्ही पण बनवा चटमटक भेळ.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर