मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताच्या चकल्या

Photo of Leftover Rice Chakli by Aarti Nijapkar at BetterButter
1335
3
0.0(0)
0

उरलेल्या भाताच्या चकल्या

Jan-06-2019
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताच्या चकल्या कृती बद्दल

कित्येक वेळा उरलेला शिळा भात कोणी खात नाही किंवा पर्याय म्हणून फोडणीचा भात , कटलेट , भज असे प्रकार करतो पण आपण कुरकुरीत तिखट चवीला उत्तम व बघताच संपणारी अशी पाककृती करणार आहोत उरलेला भात पाणी न घालता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊन मग त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला , जिरे धने पूड, हळद , चविनूसार मीठ , पांढरे तीळ , ओवा, बेसन पीठ व तांदळाचे पीठ व मोहन सर्व साहित्य एकजीव करून पीठ मळून चकलीच्या साच्यात घालून चकल्या पाडा व गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या गरमागरम उरलेल्या भाताच्या चकल्या तयार आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेला / शिळा भात १ वाटी
  2. बेसन १/३ वाटी
  3. तांदळाचे पीठ १/३ वाटी
  4. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  5. पांढरे तीळ १ लहान चमचा
  6. ओवा १ लहान चमचा
  7. हळद १/४ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. लाल तिखट १ लहान चमचा
  10. गरम मसाला १ लहान चमचा
  11. धने पूड १/२ लहान चमचा
  12. जिरे पूड १/२ लहान चमचा
  13. मोहन १ लहान चमचा
  14. तेल चकल्या तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम एक भांड्यात उरलेला/ शिळा भात घ्या तो सुटसुटीत करून घ्या
  2. मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्या
  3. भांड्यात काढून त्यात बेसन पीठ , तांदळाचे पीठ, आलं लसूण पेस्ट ,ओवा , पांढरे तीळ , हळद , चवीनुसार मीठ, लाल तिखट , धने जिरे पूड, गरम मसाला , व मोहन घाला
  4. मिश्रण एकजीव करून घ्या
  5. आता चकलीच्या साच्याला आतून थोडं तेलाचे बोटे फिरवून घ्या
  6. तयार मिश्रणाचा लांब गोलाकार आकाराचा करून साच्यात घाला व वरून तेलाच्या बोटांनी आत दाबा व साच्याच झाकण लावून घ्या
  7. गॅस वर कढईत तेल तापत ठेवा
  8. किचन पेपर किंवा पसरत ताट उलटं करून त्यावर थोडं तेल पसरवून घ्या म्हणजे चकल्या चिटकणार नाही सर्व चकल्या पाडून घ्या
  9. तेल तापले की त्यात चकल्या घालून मध्यम आचेवर दोन्हीं बाजूने लालसर / सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे
  10. अश्याप्रकारे सर्व चकल्या तळून घ्यावे
  11. मस्त खमंग आणि चवदार अश्या उरलेल्या भाताचे चकल्या खाण्यास तयार आहे
  12. काही वेळातच सर्व चकल्या फस्त होतील

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर