मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापुरी मिसळ पाव

Photo of Kolhapuri misal pav by Manisha Khatavkar at BetterButter
1323
3
0.0(0)
0

कोल्हापुरी मिसळ पाव

Jan-07-2019
Manisha Khatavkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापुरी मिसळ पाव कृती बद्दल

कोल्हापुरी मिसळ ही कोल्हापूरच्या तांबड्या-पांढर्‍या रश्याला वढीत जगप्रसिद्ध आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप मोड आलेली मटकी
  2. १ कांदा उभा चिरून
  3. १ उभा चिरलेला टोमॅटो
  4. २ टेबल्स्पून सुके खोबरे
  5. १ टी स्पून धणे
  6. १ टीस्पून जिरे
  7. १ दालचिनी
  8. २ लवंगा
  9. ४ काळीमिरी
  10. ८ते१० लसूण पाकळ्या
  11. १/२ इंच आले.
  12. बटाट्याची सुकी भाजी, फरसाण, कोथंबीर, लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा.
  13. फोडणीसाठी साहित्य
  14. २ टेबल स्पून लाल तिखट
  15. २ टेबल स्पून लाल तिखट
  16. १ टी स्पून कांदा लसूण मसाला
  17. १ टीस्पून जिरे
  18. २ टेबल स्पून तेल
  19. चवीपुरते मीठ

सूचना

  1. सर्वात प्रथम पॅन गरम करून यामध्ये जिरे धणे दालचिनी लवंगा काळी मिरी टाकून परतत राहा २-३ मिनिटे छान वास आला की मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
  2. यानंतर सुके खोबरे देखील भाजून प्लेट मध्ये काढून घ्या.
  3. त्याच पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण कांदा लसूण आलं टाकून परतून घ्या थोडा कांदा शिजला आणि परतला की मग त्यामध्ये टोमॅटो घालून तोही परता आणि चांगलं खरपूस भाजून घ्या.
  4. हा सर्व मसाला बारीक वाटून घ्या.
  5. एका भांड्यात तेल गरम करून घ्या तेल गरम झाले की त्यावर जिरे टाकून ते तडतडले की लाल तिखट कांदा लसूण मसालाआणि वाटण घालून छान मिक्स करून घ्यावे.
  6. मसाला चांगले परतून परतून घ्या मसाल्याला तेल सुटायला लागले की मग त्यामध्ये  शिजवलेली मटकी घाला.
  7. चवीपुरते मीठ व गरजेनुसार पाणी घालून चांगली झाकण ठेवून चांगली आपण पाच सहा ते सहा मिनिटं मिसळ चांगली उकळून घ्यावी.
  8. आपली मिसळ सर्व करण्यासाठी रेडी आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर