मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मिश्रकडधान्याची पौष्टीक चकली

Photo of Sprouted Beans Chakli by Suchita Wadekar at BetterButter
40
8
0.0(0)
0

मोड आलेल्या मिश्रकडधान्याची पौष्टीक चकली

Jan-08-2019
Suchita Wadekar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मिश्रकडधान्याची पौष्टीक चकली कृती बद्दल

कडधान्याचे महत्व लक्षात घेता याचा जास्तीत जास्त वापर रोजच्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने व्हावा यासाठी वेगवेगळे पदार्थ करून बघितले. मोड आलेल्या मिश्र कडधान्याची पौष्टीक चकली त्यातूनच जन्माला आली आणि उत्कृष्ट जमली, म्हणजे चव, खुसखुशीतपणा एकदम 1 नंबर:ok_hand: नक्की करून पहा. तत्पूर्वी थोडा गुगल सर्च ... तेवढीच knowlage मध्ये भर ... :blush: मोड आणलेली कडधान्ये खाणे खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. महाराष्ट्रामध्ये कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. मोड आलेली कडधान्ये खाण्याचे फायदे - 1. प्रथिने पचायला सोपी होतात. 2. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते. 3. कडधान्याला मोड आणल्यामुळे 'क' जीवनस्तवाची वाढ होते. 4. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. 5. मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये कडधान्ये हलके होतात आणि पचायला सुलभ होतात. 6. मोड आलेली कडधान्ये सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडांमध्ये कर्बोदके आणि ‘क’ जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढतात. 7. सुकविलेले मोड थोडा वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात. अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात. 8. मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरूकिल्ली. कोणती कडधान्ये खावी ? ..... सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग व चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असते. कडधान्यात भरपूर पोषक तत्वे असतात. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे एका वर्षात दर माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्ये वापरणे आवश्यक आहे. म्हणूनच कडधांन्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. ● मोड आलेले कडधान्य 1 वाटी
 2. ● पोहे 1 वाटी
 3. ● तांदूळ पीठ 2 वाटी
 4. ● लाल तिखट 2 चमचे
 5. ● ओवा 1 चमचा
 6. ● तीळ 2 ते 3 चमचे
 7. ● अमूल बटर 1 चमचा
 8. ● मीठ आवश्यकतेनुसार
 9. ● हिंग अर्धा चमचा
 10. ● हळद अर्धा चमचा
 11. ● तळण्यासाठी तेल

सूचना

 1. 1. प्रथम मोड आलेले मिश्र कडधान्य हिंग, हळद घालून वरणाप्रमाणे कुकरला शिजवून घ्यावे.
 2. 2. ओवा मिक्सरला थोडा ओबडधोबड होईल इतपत बारीक करावा.
 3. 3. पोहे तव्यावर हलकेसे गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यावे.
 4. 4. नंतर शिजवलेल्या कडधान्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून एका घमेल्यात काढून घ्यावी.
 5. 5. नंतर यात बारीक केलेले पोहे, ओवा, तीळ, लाल तिखट, अमूल बटर आणि तांदळाचे पीठ घालावे व चांगले मळून घ्यावे.
 6. 6. गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे आणि सोऱ्याला तेल लावून भिजवलेले पीठ सोऱ्यात घालून चकल्या कराव्यात.
 7. 7. तेल तापले की गॅस बारीक करावा आणि चकल्या तळून घ्याव्यात.
 8. ● आपली खमंग, खुसखुशीत मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली पौष्टीक चकली तैयार!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर