मुख्यपृष्ठ / पाककृती / चमचमीत दाळ कांदा,भाकरी (गावराण पद्धत)

Photo of Spicy Daal Kanda, Bhakri (Village Style) by Tejashree Ganesh at BetterButter
248
3
0.0(0)
0

चमचमीत दाळ कांदा,भाकरी (गावराण पद्धत)

Jan-11-2019
Tejashree Ganesh
490 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चमचमीत दाळ कांदा,भाकरी (गावराण पद्धत) कृती बद्दल

ही रेसिपी तशी फार प्रसिद्ध आहे ह्या ठिकाणी मी गावराण पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

 1. हरभरा दाळ १/२ कप
 2. कांदे २ मध्याम आकाराचे
 3. टोमॅटो १
 4. आलं-लसून १ मोठा चमचा कुटून
 5. तेल २-३ मोठे चमचे
 6. मिरची पुड १ लहान चमचा किंवा चविनुसार
 7. घरचा लाल मसाला किंवा गोडा मसाला १ मोठा चमचा
 8. हिंग १/२ लहान चमचा
 9. मिठ चविपुरते
 10. पाणी आवश्यकतेनुसार (शिजविण्याकरिता)
 11. कोथिंबीर मुठभर
 12. कोळसे २
 13. तेल १/२ लहान चमचा (smok करिता)

सूचना

 1. सर्व प्रथम हरभरा डाळ निवडूून, स्वच्छ धुवून ७-८ तास भिजत घालावी.
 2. सर्व साहित्य एका प्लेटमधे घ्यावे.
 3. कोरडे साहित्य एका छोट्या प्लेटमधे घेतले.
 4. कढईमधे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा.
 5. कांदा गुलाबी रंगावर आला की त्यात आलं लसून ठेचून घालावं.
 6. नंतर सर्व कोरडे मसाले घालावेत.
 7. मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.
 8. नंतर टोमॅटो घालावे.
 9. चविनुसार मिठ घालावे.
 10. मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून झाकण ठेऊन वाफेवर २-३ मि. शिजू द्यावे.
 11. झाकण काढून पुन्हा एकदा सर्व एकत्र करून घ्यावे.
 12. आता ह्यामधे डाळ घालावी.
 13. डाळ व्यवस्थित परतून घ्यावी. ह्यामुळे भाजी खमंग लागते.
 14. गरम पाणी घालावे व पुन्हा व्यवस्थित एकजीव करावे.
 15. झाकण ठेऊन ३-४ मि. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
 16. चुलीवरच्या भाजीची चव येण्याकरिता खालील पद्धत वापरली आहे. त्याला smoke देणे असे म्हणतात.
 17. Smok देण्याची पद्धत बाजूला एक कोळसा जाळावर ठेवून निखारा तयार करवा.
 18. भाजी शिजली की ह्याप्रमाणे वाटीमधे तापलेला कोळसा ठेवून लगेत त्यावर तेल टाकावे व लगेचच झाकण ठेवावे.
 19. ह्या पद्धतीने..
 20. ५-७ मि. नंतर झाकण काढावे व बारिक चिरलेली कोथिंबीर भाजीवर पेरावी.
 21. गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत हे कालवण झक्कास लागते....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर