मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या चण्याचे गलौटी कबाब

Photo of Galauti kabab by Teesha Vanikar at BetterButter
30
3
0.0(0)
0

काळ्या चण्याचे गलौटी कबाब

Jan-14-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या चण्याचे गलौटी कबाब कृती बद्दल

ही माझी फ्युजन रेसीपी आहे,गलौटी कबाब राजम्याचे बनवतात पण मी काळ्या चण्याचे बनवले आणि खरच खुप टेस्टी झालेत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • फ्युजन
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १मोठी वाटी भिजलेले काळे चणे
 2. १मोठा कांदा बारीक कापलेला
 3. १/२वाटी भिजवलेले पोहे
 4. २चमचे काँर्न फ्लावर
 5. २चमचे मैदा
 6. १चमचा लाल तिखट
 7. १चमचा आल,लसुण पेस्ट
 8. १चमचा गरम मसाला
 9. १चमचा जीरा पावडर
 10. ३चमचे तेल किवां तुप
 11. कोथिंम्बीर
 12. १/२चमचा दालचिनी पावडर
 13. ३चमचे रवा
 14. हळद
 15. हिंग
 16. मीठ

सूचना

 1. प्रथम चणे शिजवुन थंड करुन घ्या
 2. मग चणे मिक्सर मधुन काढुन घ्या
 3. मोठ्या बाऊलमध्ये चणे पेस्टकाढुन घ्या
 4. ह्यात सर्व दिलेली सामग्री घालुन हाताने मिक्स करुन घ्या
 5. नाँनस्टिक पैनमध्ये तेल गरम करा
 6. तयार मिश्रणाचे चपटे गोल पेठे तयार करुन घ्या
 7. आता हे पेठे रव्यात दोन्ही साईडला घोळुन घ्या
 8. हे पेठे आता पैन मध्ये ठेवुन दोन्ही बाजुने शैलो फ्राय करुन घ्या
 9. तयार आहे गरमागरम चण्याचे गलौटी कबाब सर्व्ह करा साँस किवां चटणीसोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर