रवा इडली | Rava Idli Recipe in Marathi

प्रेषक Arti Gupta  |  1st Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rava Idli recipe in Marathi,रवा इडली , Arti Gupta
रवा इडली by Arti Gupta
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

250

0

Video for key ingredients

 • Sambhar Powder

 • How to make Idli/Dosa Batter

रवा इडली recipe

रवा इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava Idli Recipe in Marathi )

 • 1 1/4 कप गव्हाचा कोंडा ( रवा )
 • 2 कप ताक ( 1/2 कप फेटलेले दही + 1 1/2 कप पाणी )
 • 1/2 टी स्पून किंवा चवीनुसार मीठ
 • 1 टेबल स्पून तेल
 • फोडणीसाठी :
 • 1/2 टी स्पून मोहरी
 • 1 चिरलेली हिरवी मिरची
 • 1 टी स्पून उडीद डाळ
 • 1 टी स्पून हरभरा डाळ
 • थोडा कढीपत्ता
 • स्लाईस केलेले खोबरे
 • 8-10 काजू
 • तेलकट करण्यासाठी .. 1 टी स्पून तेल
 • 1 सॅचे इनो फ्रूट साल्ट किंवा 1 टेबल स्पून इनो. बॅटरमध्ये घालावे.

रवा इडली | How to make Rava Idli Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये गव्हाचा कोंडा, ताक, मीठ व 1 टेबल स्पून तेल एकत्र मिसळून 30 मिनिटे बाजूला ठेवावे.
 2. आता अर्ध्या तासाने फोडणीची तयारी करावी. 1 टेबल स्पून तेल गरम करावे. त्यात मोहरी टाकावी . ती तडतडल्यावर उडीद डाळ घालून भाजावे, हरभरा डाळ घालून भाजावे. आता चिरलेल्या मिरच्या, खोबऱ्याचे स्लाईस आणि कढीपत्ता घालावा .
 3. तयार केलेल्या बॅटरमध्ये ही फोडणी घालावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे , त्यात थोडेसे पाणी घालावे.
 4. आता इडलीच्या साच्याला तेलकट करावे.
 5. इडली कुकर तयार करावा.
 6. बॅटरमध्ये इनो साॅल्ट घालावे. हलकेसे ढवळून घ्यावे आणि त्यातून बुडबुडे यायला लागल्यावर बॅटर लगेच इडली साच्यात ओतावे आणि 8-10 मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
 7. साच्यातून इडली काढाव्यात आणि सांबार व चटणी सोबत आनंद घ्यावा. तळलेल्या काजूने सजवावे.

My Tip:

आम्ही दिलेल्या फोडणी देण्याच्या पद्धतीमुळे दह्याचा किंवा ताकाचा वास कमी होण्यास मदत तर मिळतेच पण इडलीची चव देखील जास्त चांगली होते.

Reviews for Rava Idli Recipe in Marathi (0)