मुख्यपृष्ठ / पाककृती / गहु रवा मेथी लाडू

Photo of gahu rava methi ladoo by supriya padave (krupa rane) at BetterButter
2827
6
0.0(0)
0

गहु रवा मेथी लाडू

Feb-25-2019
supriya padave (krupa rane)
25 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहु रवा मेथी लाडू कृती बद्दल

पौष्टिक लाडू या मधे गहु रवा मेथी व् गुळ वापरला आहे त्यामुळे हे खुप healty आहेत तसेच सांधे व् हाडांच्या मजबूतिला पण चांगले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाटी गहु पिठ
  2. एक वाटी रवा
  3. दोन वाटी गुळ
  4. पाच टेबलस्पून मेथी पावडर
  5. अर्धा वाटी काजू व् खारिक चे तुकडे
  6. अर्धा वाटी डिंक
  7. दोन टेबलस्पून हलिम्
  8. दोन वाटी तूप
  9. एक वाटी सुके खोबरे

सूचना

  1. सुके खोबरे किसुन कोरडेच गुलाबी रंगावर भाजुन घ्या
  2. हलीम सुद्धा कोरडाच् भाजुन घ्या
  3. गुळ बारीक चिरून घ्या काजू व् खरिक बारीक करून त्याची मिक्सरला पूड करुन घ्या
  4. कढ़ईत दोन चमचे तूप टाकून त्यात डिंक चांगला फुलवुन घ्या
  5. आता थोड़े तूप टाकून गहु पीठ गुलाबी रंगावर भाजुन घ्या
  6. रवा पण तुपात खमंग भाजुन घ्या
  7. एका परातीत सुक खोबरे हलीम व् डिंक हाताने चांगला चुरून घ्या नंतर त्यात मेथी पावडर गहु पीठ व् रवा टाकून एकजीव करुन घ्या
  8. आता हयात बारीक केलेला गुळ मिक्स करा व् चांगले एक्जीव करुन घ्या
  9. हे मिश्रण थोड़े थोड़े करुन मिक्सरला फिरवुन घ्या असे केल्या मुळे गुळ चांगला एकजीव होतो व् तूप सुद्धा कमी लागते
  10. आता ह्या मिश्रणात थोड़े तूप घाला व् लाडू वळून घ्या
  11. लाडू तैयार ....या प्रमाणात साधारण 30 ते 32 लाडू होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर