मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटर मलई

Photo of Methi Matar Malai by Sonia Shringarpure at BetterButter
909
4
0.0(0)
0

मेथी मटर मलई

Feb-27-2019
Sonia Shringarpure
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटर मलई कृती बद्दल

मेथी ही प्रचंड पौष्ठीक भाजी आहे परंतु मुलांना ती एवढी आवडत नाही कारण थोडी कडू असते. माझी ही रेसिपी करून पाहा, घरातल्या सर्व मंडळी यांना आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ जुडी मेथी (फक्त पाने)
  2. १/२ कप अर्ध शिजलेले हिरवे वाटाणे (मटर)
  3. १ चिरलेला कांदा
  4. २ हिरव्या मिरच्या
  5. ४ लसूण पाकळ्या चिरलेल्या
  6. १/२ इंच आलं चिरलेले
  7. १/४ कप काजू तुकडे
  8. २ टॅब्लेस्पून बदामाची पूड
  9. १ कप दूध
  10. १/४ कप ताझी मलई
  11. १/२ चमचा गरम मसाला पूड
  12. १/२ चमचा बडीशेपची पूड
  13. १/२ चमचा हिरव्या मिरचीचे वाटण
  14. २ चिमटे दालचिनी पूड
  15. २ लवंग
  16. १/२ इंच दालचिनी तुकडा
  17. ३ हिरवी वेलची
  18. मीठ स्वादानुसार
  19. पाणी लागेल तसं
  20. ४-५ मोठे चमचे तेल
  21. १/२ चमचा कसुरी मेथी

सूचना

  1. मेथी स्वच्छ दुहून घ्या आणि बारीक चिरून घ्या. चिरलेल्या मेथीला मीठ लावून ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर परत एकदा भाजी दुहून घ्या. भाजी घट्ट पिळून पाणी काढून घ्या.
  2. एका कढईत तेल तापवायला ठेवा. मेथी आणि हिरवे वाटाणे त्यावर परतून घ्या. ५ मिनिटांनी प्लेट मध्ये काढून घ्या.
  3. कढई साफ करून घ्या आणि पुन्हा त्यात २-३ चमचे तेल तापवा. मग ह्यात लवंग, हिरवी वेलची, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, आणि दालचिनी टका. थोडे परतवा. आता कांडा टाकून चांगले परतून घ्या.
  4. कांडा चांगला मऊ झाला की काजू आणि बदामाची पूड टका. परतवा. १/२ कप पाणी टाकून परतवा आणि कढईला झाकण लावून ५ मिनिटे शिजवा. चांगली उकळी येयला हवी आणि पाणी सुखल हव.
  5. मिश्रण थंड करा आणि दुधाबरोबर बारीक वाटून घ्या.
  6. परत कढई साफ करून घ्या किव्हा दुसरी कढई घ्या. गॅस पेटवा आणि कढई तापवू द्या. त्यात मेथी आणि वाटाणे टका आणि वाटलेला मसाला देखील टका. भाजी परतून चांगले एकजीव करा.
  7. आता ह्यात मलई, हरवू मिरची वाटण, बडीशेप पूड, दालचिनी पूड, गरम मसाला पूड आणि स्वादानुसार मीठ टका. बारीक गॅस ठेवून भाजी उकलेस पर्यंत घोटत राहा. वरतून कसुरी मेथी पेरा. बाउल मध्ये कडून घ्या. रोटी/नान सोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर