मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर- कॉर्न- पालक कुरकुरे

Photo of Paneer corn palak kurkure by seema Nadkarni at BetterButter
1239
1
0.0(0)
0

पनीर- कॉर्न- पालक कुरकुरे

Mar-06-2019
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर- कॉर्न- पालक कुरकुरे कृती बद्दल

झटपट नास्ता म्हणून मला ही पाक कृती सुचली आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बारीक चिरलेला पालक
  2. 1/2 वाटी कोनॅ
  3. 1/2 कप बारीक तुकडे पनीर चे
  4. चवी पुरते मीठ
  5. 2 चमचा लाल तिखट
  6. 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 1 चमचा ओवा
  9. 1 कप सोयाबीन चे पीठ
  10. 1 कप बेसन
  11. 1/4 कप पाणी
  12. 1 चमचा तेल
  13. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा

सूचना

  1. पालक ची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे.
  2. कोनॅ चे दाणे एक उकळी आणुन शिजवून घ्यावे.
  3. बाकी सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  4. पालक, कोनॅ, पनीर एकत्र करून घ्यावे. त्यात सगळे मसाले एकत्र करून 1 चमचा तेल घालून एकत्रित करावे.
  5. आता या मिश्रणात बेसन पीठ व सोयाबीनचे पीठ घालून एकत्र करावे.
  6. थोडे पाणी घालून पीठ तयार करावे.
  7. गॅस वर कढईत तेल तापवून घ्यावे. तयार पीठात खायचा सोडा घालून एकत्र करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे.
  8. झटपट गरम गरम चटणी व केचप सोबत सवँ करावे. यात चिझ चे तूकडे ( थंड असलेले) घालू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर