मुख्यपृष्ठ / पाककृती / Brinjal potato cheese sandwich twist

Photo of Brinjal potato cheese sandwich twist by seema Nadkarni at BetterButter
25
4
0.0(1)
0

Brinjal potato cheese sandwich twist

Mar-08-2019
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • इतर
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

 1. 1 मोठा भरीता चे वांगी
 2. 1 मोठा बटाटा
 3. 1/2 कप चीज किसलेले
 4. 1/4 कप हिरवी चटणी
 5. 2-3 चमचा टोमॅटो सॉस
 6. 2 चमचा चिली सॉस (रेड)
 7. 2 चमचा पिझ्झा मसाला
 8. 1 चमचा ओरेगेनो
 9. 1 चमचा चिली फ्लेक्स
 10. 1 चमचा काळी मिरी पावडर
 11. 1 1/2 कप बेसन
 12. चवी पुरते मीठ
 13. 1/4 टि स्पून हळद
 14. 1/4 टि स्पून बेकिंग सोडा
 15. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. सवॅ प्रथम सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
 2. बेसन पीठात मीठ व हळद घालून पाणी घालून भजी चे पीठ तयार करून घ्यावे.
 3. बटाट्याची पातळ चकत्या कापून घ्या. चिप्स करायच्या किसणी वापरले तरी चालेल.
 4. वांगी पण जमेल तेवढे पातळ चकत्या कापून घ्या.
 5. हिरवी चटणी तयार करून घ्या. अगोदर बनवलेली असेल तर अजून वेळ वाचतो.
 6. एका बाउल मध्ये टोमॅटो सॉस+चिली सॉस + पिझ्झा मसाला +चिली फ्लेक्स +ओरेगेनो एकत्र करून घ्यावे.
 7. तेल तापायला ठेवावे. आता वांगी च्या एका बाजूला हिरवी चटणी लावून घ्या. दूसरया वांगी ला केचप मसाला लावून घ्या.
 8. हिरव्या वांगी वर चिझ किसुन घ्यावे. त्या वर बटाट्याचे एक चिप्स ठेवावे. परत चिझ किसुन घ्यावे. वर काळी मिरी भुरका.
 9. आता त्या वर दुसर्‍या वांगी च काप ठेवून सेन्डविच तयार करून घ्यावे.
 10. बेसन पीठात चिमूट भर खायचा सोडा घालून एकत्र करावे व वरील तयार केलेले सेन्डविच त्यात बुडवून तेलात तळून घ्यावे.
 11. मघ्यम आचेवर तळून घ्यावेत.
 12. गरम गरम चटणी व केचप सोबत सवँ करावे.
 13. मी इथे किसलेले चीज वापरले आहे. चिझ चे स्लाइस असेल तरी चालेल..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-08-2019
samina shaikh   Mar-08-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर