Photo of Matar pohe by Chayya Bari at BetterButter
924
4
0.0(0)
0

मटार पोहे

Mar-10-2019
Chayya Bari
7 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पोहे कृती बद्दल

मटार सीझन मध्ये मटार पोहे तर हवेतच .जणू पोह्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मटार वापरले जातात.20 मिनिटात होणारी ही रेसिपी पाहुण्यांना नक्कीच खूष करेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 2 वाट्या
  2. कांदा 1
  3. बटाटा 1
  4. मटार दाणे 1/4वाटी
  5. शेंगदाणे 2 चमचे
  6. जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता फोडणीसाठी
  7. तेल 4 चमचे
  8. कोथिंबीर
  9. हिरव्या मिरच्या 4
  10. हळद 1चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. लिंबाचा रस 1चमचा
  13. साखर चिमुटभर

सूचना

  1. प्रथम पोहे चाळणीत घेवून धुवून ठेवावे. पातळ पोहे असतील तर पानी शिंपडावे व बाकीची तयारी करावी
  2. तेल तापवून त्यात जिरे , मोहरी, हिंग ,कढीपत्त्याची फोडणी करावी
  3. गॅस बारीक करून शेंगदाणे टाकावे खरपुस परतून मिरची कापून टाकावी
  4. आता सोलून कापलेला बटाटा व मटार दाणे घालून परतावे
  5. झाकण ठेवून वाफ घ्यावी
  6. मटार,बटाटा मऊ झाले की हळद,चिमुटभर साखर व 1 चमचा लिंबाचा रस घालावा छान मिक्स करावे
  7. आता भिजवलेले पोहे घालून छान हलवावे दणदणीत वाफ घ्यावी गॅस बंद करून कोथिंबीर घालून मिक्स करावे
  8. गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर