मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी पराठा

Photo of Beri paratha by Manasvi Pawar at BetterButter
578
4
0.0(0)
0

बेरी पराठा

Mar-14-2019
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी पराठा कृती बद्दल

दरवेळी तूप केले की उरलेली बेरी मी काढून टाकते.पण काल मी ठरवलं की यावेळी नक्की काहीतरी पदार्थ करून बघायचा आणि मला ही रेसिपी सुचली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी तूप करून राहिलेली बेरी
  2. ४-५ लाल सुक्या मिरच्या
  3. ४-५ लसूण पाकळ्या
  4. १ चमचा जिरे
  5. २ चमचे धणे
  6. थोडं आलं
  7. मीठ चवीनुसार
  8. चवीपुरते साखर
  9. तेल भाजण्यासाठी
  10. एक वाटी कणीक

सूचना

  1. कणीक मळून घ्या थोडं घट्ट
  2. आता बेरी आणि इतर साहित्य धणे जिरे मिरच्या मीठ आलं लसूण सगळे एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्या
  3. आता कणकेचे गोळे करून त्यामध्ये हे बेरीचे सारण अशा प्रकारे भरा
  4. गोळे भरुन झाल्यावर कणकेत बुडवून थोडं जाडसर पराठा लाटून घ्या
  5. तवा गरम करून एक चमचा तेल घालून पराठा तव्यावर घाला
  6. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
  7. गरम गरम साॅस बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर