मुख्यपृष्ठ / पाककृती / "कैरीचे पन्हे"

Photo of Kairi Panhe by Suchita Wadekar at BetterButter
41
1
0.0(0)
0

"कैरीचे पन्हे"

Mar-29-2019
Suchita Wadekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"कैरीचे पन्हे" कृती बद्दल

उन्हाळ्यात शरीराला थंडावा येण्यासाठी तसेच पचनशक्ती वाढवण्यासाठी हे कैरीचे पन्हे अतिशय उपयुक्त ठरते. कृतीही अतिशय सोपी आहे आणि आपण हे फ्रीज मध्ये साठवू शकतो

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. अर्धा किलो कैरी साधारणतः 2 ते 3
 2. गुळ 3 वाटी बारीक चिरलेला (कैरीच्या आंबटपणावर याचे प्रमाण ठरवावे)
 3. वेलची पावडर 1 चमचा
 4. मीठ आवश्यकत्यानुसार
 5. पाणी आवश्यकत्यानुसार

सूचना

 1. प्रथम कैरीची साले काढून फोडी करून घ्याव्यात.
 2. त्या कुकरमध्ये स्टीलच्या भांडयात ठेवून वाफवून घ्याव्यात.
 3. नंतर ह्या फोडींना पुरणयंत्रात किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवावे.
 4. आता हे मिश्रण गाळण्यातून अथवा तारेच्या चाळणीतून गाळून घ्यावे. त्यात मीठ व गूळ घालावे तसेच वेलचीपूड घालून मिश्रण सारखे करावे.
 5. हे मिश्रण तयार करून आपण फ्रीज मध्ये ठेवून हवे त्यावेळी या मिश्रणाचे पन्हे तयार करू शकतो.
 6. प्यायला देतेवेळी या मिश्रणाचे ४-५ चमचे घेऊन त्यात थंडगार पाणी घालावे आणि चवीपूरते मीठ घालून सर्व नीट हलवून द्यावे. आपले थंडगार पाचक पन्हे तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर